एक्स्प्लोर

शेतकऱ्यांनी शेतजमिनींचा मोबदला मागितला, सरकारने तुरुंगवास दिला

लातूर जिल्ह्यात सध्या महामार्ग क्रमांक 752 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शेतकऱ्यांशी न बोलता, त्यांना कोणताही मोबदला न देता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर या महामार्गाचे काम सुरु केले आहे.

लातूर : जिल्ह्यात सध्या महामार्ग क्रमांक 752 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शेतकऱ्यांशी न बोलता, त्यांना कोणताही मोबदला न देता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर रस्त्यांचे काम सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी याचा मोबदला मागितला परंतु त्यांना कोणतेही लेखी किंवा तोंडी आश्वासनदेखील दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज लातूरमध्ये रस्त्याचे काम थांबवले, परिणामी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सरकारला लातूरातील रस्त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लातूर जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जाणार आहेत. या रस्त्यासाठी वाढीव भूसंपादनाची कोणतीही माहिती न देता काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज रस्त्याच्या कामाला विरोध केला. यापूर्वीदेखील शेतकऱ्यांनी याप्रकरणी आंदोलने केले. परिणामी सरकारने बाधित 600 शेतकऱ्यांपैकी पाच टक्के शेतकऱ्यांना 54 कोटी 70 लाख रुपये मोबदला दिला आहे. उरलेल्या 95 टक्के शेतकऱ्यांना अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामध्ये प्रामुख्याने अंसरवाडा लांबोटा आणि निलंगा शिवारातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी आज दुपारी काम बंद आंदोलन केले. शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम थांबवल्यानंतर कंत्राटदाराच्या तक्रारीवरून निलंगा पोलिसांनी येथील 47 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका शेतकरी महिलेचा समावेश आहे. काही दिवसापूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. संतप्त शेतकऱ्यांनी जामीन घेण्यासाठी नकार दिला होता. हे प्रकरण निलंगा कोर्टात सादर केल्यानंतर यातील दोषी शेतकऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. जमिनीचा मोबदला तर मिळालाच नाही, परंतु त्यासाठी आंदोलन केले तर थेट तुरुंगवास भोगावा लागत असल्याने सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे भुसणी, पानचिंचोली, बाभळगाव, निटूर, मुगाव यांसह दहा गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget