एक्स्प्लोर

ऑनलाईन खरेदीच्या विरोधात अडते आक्रमक, लातुरात गोंधळ

बराच वेळ हे सर्व अडते कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वार जवळ ठिय्या मांडून बसले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि अडते यांच्यात बोलणी झाल्यावर हा तिढा तात्पुरता मिटला. उद्यापासून बाजार सुरू होणार आहे.

लातूर : शेतकऱ्यांचा माल थेट खरेदीदाराने खरेदी करावा यासाठी सरकारने अडत्यांची मध्यस्थी संपविण्यासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय आणला आहे. त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण आणले आहे. मात्र या व्यवहारात काही अनियमितता आल्यास फटका मात्र अडत्यांना बसत आहे. त्यांचे पैसे यामुळे अडकून पडत आहेत. या ऑनलाईन खरेदीच्या विरोधात लातूरमध्ये अडते आक्रमक झाले असून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कुठलाही सौदा निघाला नाही. काही महिन्यांपूर्वी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने ऑनलाईन खरेदी व्यवहार करणे अनिवार्य केले होते. यात फक्त सोयाबीनचा समावेश करण्यात आला होता. हा नियम करताच अडत्यांनी त्यास विरोध केला होता. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सर्व जबाबदारी घेत ऑनलाईन खरेदी प्रक्रिया सक्तीची केली होती. सुरुवातीपासूनच या प्रक्रियेत पेमेंट उशिरा येणे, चढा भाव अशा अनेक समस्यांनी अडते जेरीला आले होते. त्यातच तीन खरेदीदारांनी 125 पेक्षा जास्त अडत्याचे 13 कोटींपेक्षा जास्त रक्कम अडवून ठेवल्याने अडते आज आक्रमक झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने आता मध्यस्थी करावी, आमचे पैसे अडकले आहेत, ते द्यावेत अशी भूमिका घेत आज बाजार बंद ठेवला. बराच वेळ हे सर्व अडते कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वार जवळ ठिय्या मांडून बसले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि अडते यांच्यात बोलणी झाल्यावर हा तिढा तात्पुरता मिटला असून उद्यापासून बाजार सुरू होणार आहे. अडत्यांचे ऑनलाईन खरेदीच्या प्रकारामुळे हातातील व्यवहार जात आहे. खरेदीदाराकडून थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जात आहे. यामुळे वर्षानुवर्षांचा त्यांच्या व्यवहारावरच गदा येत आहे. शेतकऱ्यांना अडते काही प्रमाणात उचल देत असतात. ऑनलाईन खरेदीत ही उचल काटता येत नाही. खरेदीदाराने पैसे उशिरा जमा केले तर पैसे अडकून पडतात. नियमाने 24 तासात पैसे देणे बंधनकारक असताना पैसे महिना-महिना अडकून पडले आहेत. याचा शेतकऱ्यांपेक्षा अडत्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

Embed widget