Government Ayurvedic College : अपूर्ण सुविधांचा ठपका ठेवत राज्यातील सर्वच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांना (Government Ayurvedic College) पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील प्रवेशांना मनाई करण्यात आली आहे. वैद्यकीय मानांकन आणि मूल्यांकन मंडळांच्या पत्रानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर महाविद्यालयाने 31 डिसेंबरपर्यंत हे निकष पूर्ण केले तरच प्रवेश दिला जाऊ शकतो असं देखील सांगण्यात आलं आहे.


पाच शासकीय महाविद्यालयांना ही मनाई  


दरम्यान, 2022-23 चे सत्र हे 10 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक निर्णय घेण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना धक्काच बसला आहे. वैद्यकीय मानांकन व मूल्यांकन मंडळांच्या पत्रानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या भारतीय चिकित्सक प्रणालीच्या आयुष्य विभागाने निर्णय घेतला. दरम्यान, राज्यात पाच शासकीय, 14 अनुदानित, 60 खासगी बिगर अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालये आहेत. नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, जळगाव आणि मुंबई येथील पाच शासकीय महाविद्यालयांना ही मनाई करण्यात आली आहे.  महाविद्यालयानं अपेक्षित प्राध्यापकांच्या संख्येचा निकष पूर्ण करणं, आवश्यक तेवढ्या खाटेची सुविधा उपलब्ध नसणं, पदवीत्तर पदवी संशोधन कार्यासाठी लागणारे संशोधन गृहात मोठ्या प्रमाणात त्रुटी असणं, 80 टक्के नोकरभारती न करणे हे प्रश्न प्रतिबंधांना कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे.


आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळावा ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती मात्र...


नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवीच्या 125 जागा आहेत. तर पदवीत्तर  अभ्यासक्रमाच्या 80 जागा आहेत. पदवी अभ्यासक्रमाची एका सत्राची फी ही 42 हजार रुपये आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची फी ही 50 हजार आहे. तर दुसरीकडे खासगी महाविद्यालयामध्ये पदवीची दोन लाखाच्या घरात फी आहे. तर  पदव्युत्तर अभ्यासक्रमाची फी ही तीन ते पाच लाखाच्या घरात आहे. त्यामुळं सामान्यता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळावा ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. मात्र, जर का राज्यातील पाचही शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये प्रवेश बंदी असेल मग विद्यार्थ्यांनी जायचे कुठे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.


दरम्यान, महाविद्यालयानं 31 डिसेंबरपर्यंत हे निकष पूर्ण केले तरच सत्र 2022- 23 साठी प्रवेश दिला जाऊ शकतो. नाहीतर यावर्षी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश बंदी ही कायम असणार आहे.  त्यामुळं राज्यातील साधारण एक हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Job Majha : भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय पुणे आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती