एक्स्प्लोर
Advertisement
"यायला लागतंय...आरक्षण द्यायलाच लागतंय", कोल्हापुरात हटके बॅनर्स
कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब उद्या कोल्हापुरात धडकणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चाची कोल्हापूरकरांनी अस्सल रांगड्या पद्धतीने तयारी केली आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरुन याचा प्रत्यय येतो.
शहरात कोल्हापुरी स्टाईलने बॅनर लागले आहेत. यात कोल्हापुरी बाण्यात मोर्चात सहभागी होण्यासाठी आमत्रंण दिलं आहे. "मोर्चाला याला लागतंय", "अहं!! या नाही यायचंच" अशी वाक्यं वाहनांवर, टी-शर्टवर, डिजिटल बोर्डवर दिसत आहेत.
कोल्हापुरातील फ्लेक्सची सध्या महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा सुरु आहेत. हे फ्लेक्स सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या फ्लेक्ससोबतच विविध समाजांच्या समर्थनाचे फ्लेक्सही कोल्हापुरात झळकत आहेत.
दरम्यान, कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी मोर्चाची जोरदार तयारी केली आहे. मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंगची ठिकाणं सोशल मीडियावरुन नागरिकांना कळवण्यात आली आहेत.
दुसरीकडे पोलिसांनीही चोख बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets