सांगली : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीसह नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. रेहाना मुतवली असं मयत महिलेचं नाव आहे. प्रसूती झाल्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान हा प्रकार झाल्याचं महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत मयत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत खुर्च्यांची मोडतोड केली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या ठिकाणी पोहोचल्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईसाठी रुग्णालय अधिकारी यांना घेराव घातला.
यानंतर संतप्त महिला आणि नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस रुग्णालयात दाखल झाले.
सांगलीत गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Apr 2018 01:29 PM (IST)
रहावा मुतवली असं मयत महिलेचं नाव आहे. प्रसूती झाल्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान हा प्रकार झाल्याचं महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -