एक्स्प्लोर

आशिष शेलार घोटाळ्यांचे महारथी : प्रीती शर्मा-मेनन

मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाहांचा मुंबई दौरा सुरू आहे आणि याचदरम्यान ‘आप’च्या प्रीती शर्मा-मेनन यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर आरोपांचा भडीमार सुरू केला आहे. आशिष शेलार हे घोटाळ्यांचे महारथी आहेत. त्यांनी रिद्धी कंपनी, जी काही व्यवसाय करत नाही, तरीही ती इतका पैसा कमावते. त्यामुळे आशिष शेलारांनी महाघोटाळा केला आहे, असा आरोप प्रीती शर्मा-मेनन यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची चौकशी करण्यासाठी जी तत्परता दाखवली, तिच तत्परता शेलारांच्या बाबतीत का नाही, असा सवाल प्रीती शर्मा-मेनन यांनी केला आहे. जुलै 2016 मध्ये आपने आशिष शेलारांविरोधात मनी लाँडरिंगची तक्रार केली होती. मात्र गेल्या एका वर्षात एकाही तपास यंत्रणेने याची दखल घेतली नाही. तर दुसरीकडे ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या घरावर छापे टाकून तत्परता दाखवली. तर मग शेलारांना संरक्षण का, असा सवाल प्रीती शर्मा-मेनन यांनी केला आहे. आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण :
  • माझ्यावर जे आरोप केले गेले आहेत ते जुनेच आहेत. त्‍याचा वेळोवेळी मी सविस्‍तर कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे.
  • सर्वेश्‍वर आणि रिध्‍दी या दोन कंपन्‍यांच्‍या नावे माझ्यावर आरोप करण्‍यात आले असले तरी माझा आता या कंपन्‍यांशी कोणताही संबंध नाही. मी राजीनामा दिल्‍याचे आणि अन्‍य कागदपत्र संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत.
  • अन्‍य कपंन्यांची आणि व्‍यक्‍तींची जी नावे माझ्याशी जोडली जात आहेत, ती खोडसाळपणे जोडली जात आहेत.
  • माझी कुणाशीही भागीदारी नाही. तसेच मी कुठल्‍याही कंपनीत संचालक मंडळावर नाही. त्‍यामुळे त्‍या कंपन्‍यांमधील कोण्या अन्य व्‍यक्‍तीचे कुणाशी असलेल्‍या व्‍यवहाराशी माझा संबध नाही आणि मला त्‍यांची कल्‍पना नाही.
  • छगन भुजबळ यांची जी चौकशी सुरू आहे. त्‍याच्‍याशी संबंधित कंपन्‍या, व्‍यक्‍तीशी माझा प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्ष कोणताही संबंध नाही. त्‍यामुळे हे आरोप माझी बदनामी करणारे आहेत.
  • रियाज भाटी हा राष्‍ट्रवादीचा कार्यकर्ता असल्‍याचे त्‍याने जाहीरपणे सांगितले आहे. त्‍याचा माझ्याशी काहीही संबध नाही. तो एका क्‍लबचा मेंबर असल्‍याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो मतदार आहे. त्‍याचे माझ्यासह अन्‍य सर्वपक्षीय नेत्‍यांसोबत फोटो आहेत.
  • वानखेडे स्‍टेडियम आणि बीकेसीतील क्‍लबबाबत जे आरोप केले आहेत, त्‍यावेळी मी एमसीएचा अध्‍यक्ष अथवा व्‍यवस्‍थापकीय कार्यकारणीचा सदस्यही नव्‍हतो. त्‍यामुळे त्‍यांच्‍याशी माझे नाव जोडणे हे निव्वळ माझ्यावर अन्‍याय करणारं आहे. ते आरोप व्‍यक्‍तीगत आकसातून करण्‍यात येत आहेत.
  • भाजपाचे अन्‍य मंत्री आणि माझे सहकारी यांच्‍याबाबतही जुनेच आरोप पुन्‍हा एकदा नव्‍याने करण्‍यात आले आहेत. त्‍याबाबत स्‍वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खुलासा केलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget