एक्स्प्लोर

पोलादपूर दुर्घटना: बायकोने रोखलं, नववराने पिकनिक टाळली!

पोलादपूर बस दुर्घटना: नुकतंच लग्न झालेल्या प्रविण रणदिवे यांनी ऐनवेळी पिकनिकला जाणं टाळलं. त्यांना पत्नीने न जाण्याची विनंती केल्याने, त्यांनी ही पिकनिक टाळली.

पोलादपूर बस दुर्घटना: रायगड: पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला  फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत. या अपघातातून आणखी एक कर्मचारी बचावला. नुकतंच लग्न झालेल्या प्रविण रणदिवे यांनी ऐनवेळी पिकनिकला जाणं टाळलं. त्यांना पत्नीने न जाण्याची विनंती केल्याने, त्यांनी ही पिकनिक टाळली. पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया  प्रविण रणदिवे हे सुद्धा कोकण कृषीविद्यापीठाचे कर्मचारी आहेत. ते सुद्धा या पिकनिकला जाणार होते. मात्र नुकतंच लग्न झालेल्या प्रविण यांना त्यांच्या बायकोने न जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तब्येत बरी नसल्याचं कारण देत पिकनिकला जाणं टाळलं होतं. प्रविण रणदिवे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता ते म्हणाले, “टीव्हीवरुनच दुपारी 12.30 वाजता अपघाताची माहिती मिळाली. या वृत्ताने अतिशय दु:ख झालं. मी आज सकाळी साडेसहा वाजता सहकाऱ्यांना कॉल केला, तेव्हा तब्येत बरी नसल्याने आपण पिकनिकला येत नसल्याचं सांगितलं.  सहकाऱ्यांनी पिकनिकचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. नऊ वाजेपर्यंत चॅटिंग सुरु होतं, पण त्यानंतर कॉन्टॅक्ट झाला नाही”
पोलादपूरजवळ बस दरीत कोसळली कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला  फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली. खोल दरीत बस कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला आहे. इतकंच नाही तर मृतदेहांची अवस्था छिन्नविछिन्न झाली. अपघाताची माहिती कशी मिळाली? या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. त्या कर्मचाऱ्याने घाटातून वर येऊन या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली. आमची बस दरीत कोसळली, अशी माहिती देसाई नावाच्या कर्मचाऱ्याने विद्यापीठात फोन करुन सांगितलं, असं संजय भावे यांनी एबीपी माझाला सांगितलं. रेंज आली आणि अपघातातून वाचल्याचा थरार कळवला या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. हा कर्मचारी कसाबसा 800 फूट दरीतून आला. वर आल्यानंतर रस्त्यावर त्याच्या मोबाईलला रेंज आली, त्यानंतर त्याने सर्वात आधी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. आमची बस दरीत कोसळली, आम्हाला मदत करा, अशी माहिती प्रकाश सावंत-देसाई या कर्माचाऱ्याने दिली. या अपघाताची माहिती त्या कर्मचाऱ्याने दिली नसती, तर हा अपघात झालाय हे समजण्यास अनेक तास-दिवस लागले असते. कारण अपघात झाला, ते ठिकाण अवघड वळणाचं किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हतं. वाचलेल्या कर्मचाऱ्याने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, दापोली कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्वात आधी महाबळेश्वर पोलीस आणि पोलादपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना नेमका अपघात कुठे झाला, हेच कळत नव्हतं. बस नेमकी कुठून खाली कोसळली आणि ती बस दरीत कुठे आहे, हेच शोधण्यात पोलिसांचा वेळ गेला. अखेर पोलिसांना बस कोसळलेलं ठिकाण आणि ठिपक्याएवढी बस दिसली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं.
संबंधित बातम्या  पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 32 जणांचा मृत्यू   प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!   पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया 

महत्त्वाच्या बातम्या

2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
सात दिवसात पाऊस, साखर मिरची महाग ते राजकीय उलथापालथ, पट्टणकोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक, हजारो भाविकांनी घेतलं दर्शन 
सात दिवसात पाऊस, साखर मिरची महाग ते राजकीय उलथापालथ, पट्टणकोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक, हजारो भाविकांनी घेतलं दर्शन 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2026 | गुरुवार 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Embed widget