एक्स्प्लोर

अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यावाचून पर्याय नव्हता : प्रविण दरेकर

Pravin Darekar on Anil Deshmukh : अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, सोमवारी ईडी कार्यालयात हजेरी लावली.

Pravin Darekar on Anil Deshmukh : अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, सोमवारी ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'तपास यंत्रणापासून दूर जाता येत नाही. पाच-पाच समन्स दिल्यानंतरसुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. हायकोर्टात, सुप्रिम कोर्टात दिलासा मिळेल असा त्यांचा प्रयत्न होता. कारवाईला स्थगिती मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण कोणत्याच कोर्टानं त्यांना स्थगिती दिली नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना आज ईडीसमोर हजर राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेय की, माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचं पालन करत यंत्रणासमोर जावेच लागते.'

पाच समन्स दिल्यानंतरही ईडीच्या कारवाईला रिस्पॉन्स करत नसतील, तर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे अलिकडील काळात ईडीचीही मस्करी करायला लागले. पण शेवटी तपास यंत्रणेनं दाखवून दिलं की कायद्यापेक्षा यंत्रणेपेक्षा कुणीही मोठं नाही. न्यायालयातही प्रयत्न करण्यात आले, पण दिलासा मिळाला नाही. शेवटी कायद्यासमोर झुकावं लागलं, असे प्रविण दरेकर म्हणाले. 

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलेय. घोषणा झाली पण शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. 30 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, याबद्दल कुठेही भाष्य नाही. कुठलीही कारवाई नाही. मग अशावेळी भाजप, केंद्र सरकारवर आरोप करत आपलं अपयश झाकलं जातेय. महाविकास आघाडी सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतोय, असा टोला यावेळी प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावलाय. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात

गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget