एक्स्प्लोर

तुमच्यासारखं दगडाचं काळीज फडणवीसांचं नाही; प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर पुन्हा हल्लाबोल

Pravin Darekar : जरांगे पाटलांचा भंपकपणा रोज उघड होत असून त्यांच्या आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस व्यथित झाले असल्याचं भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले. 

मुंबई : जरांगे पाटील हे कुणाचीतरी सुपारी घेऊन बोलत असून त्यांचा एक-एक खेळ आता उघड होत असल्याचं भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले. जरांगे पाटील, तुमच्यासारखे दगडाचे काळीज असलेले देवेंद्र फडणवीस नाहीत. त्यांना जर खुर्चीचा मोह असता तर ते राजीनामा द्यायला तयार झाले नसते असं प्रवीण दरेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस त्यामध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो आरोप केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोलाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जाहीर भूमिका घेतली. जर अडथळा आहे असे वाटत असेल तर मी राजीनामा देईन असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली आणि जरांगे याचा खोटेपणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झाला. पाटील, तुम्ही बोलला ते कुणाची सुपारी घेऊन बोलला का? 

जरांगेंचा भंपकपणा रोज उघडा होतोय

खुर्चीचा मोह असता तर देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला तयार झाले नसते. मराठा समाजासाठी जो काम करतोय त्याला पश्चाताप कशाला होईल? कुणीतरी त्यांच्यावर आरोप केले, त्यामुळे देवेंद्र फडणवीस व्यथित निश्चितच झालेले आहेत. जरांगे तुम्ही तुमच्या कौतुकात मशगुल आहात. पण तुमचा भंपकपणा रोज उघड होतोय. जरांगे पाटील यांची प्रतिमा महाराष्ट्रातील माणसाच्या मनातून आता उतरू लागली आहे. 

जरांगेंचे आरोप, फडणवीसांचे उत्तर 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली या आरोपांचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केला. त्यावर फडणवीसांनी आज मात्र शेवटी निर्वाणीचं उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पदाचा राजीनामा देऊन राजकारण सोडेन, अशी तयारीच देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची राहिलीय अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिली.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget