Pravin Darekar : मुंबई बँकेच्या संचालकपदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दरेकरांना विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून, त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतील रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना आज चौकशीला हजर राहण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दरेकरांना आज चौकशीला बोलावलं आहे. दरम्यान चौकशीत पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकर बोगस सदस्य असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेशही सहकार विभागाने जारी केले आहेत. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. ते बिनविरोध निवडून आले होते. मात्र, मुंबई सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवले होते. 1997 पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, या तक्रारीवर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही. अखेरीस दोन महिन्यांनंतर दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. याविरुद्ध दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द व्हावा, अशी याचिका केली. ही याचिका प्रलंबित ठेवत उच्च न्यायालयाने दरेकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जाण्यास सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- BJP- MNS : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा
- ...तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सोडून देऊ ; काँग्रेस नेते आशिष देशमुख