कल्याण - डोंबिवली : रेल्वे हॉस्पिटलचा डिव्हिजनल डॉक्टर असल्याचं भासवून वावरणाऱ्या एका बोगस डॉक्टरला कल्याण रेल्वे पोलिसांकडून बेड्या घालण्यात आल्या आहे. या बोगस डॉक्टरकडून स्टेथोस्कोप, तसंच रेल्वे व शासनाची पाच खोटी ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे.
रेल्वे हॉस्पिटलचा डिव्हिजनल डॉक्टर असल्याचं भासवून वावरणाऱ्या एका बोगस डॉकटरला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकी इंगळे असे या भामट्याचे नाव असून अतिशहाणपणा त्याच्या अंगलट आला आहे. त्याच्याकडून स्टेथोस्कोप, रेल्वे व शासनाचे पाच खोटे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे .अंबरनाथ रेल्वे स्थानकात चार ते पाच अल्पवयीन दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करत तो टीसीकडे गेला .त्याने मी रेल्वे हॉस्पिटलमध्ये डिव्हिजनल डॉक्टर असल्याचे सांगितले. मात्र टीसीला संशय आला याबाबत रेल्वे पोलिसांनी शहानिशा केली असता हा इसम बोगस डॉकटर असल्याचे लक्षात आले .
अंबरनाथ रेल्वे स्थानकातील टीसी कार्यलयात काल विकी इंगळे हा चार ते पाच अल्पवयीन मुलांना घेऊन गेला. या मुलांकडे तिकीट नसल्याचे सांगत त्यांना दंड करा असे सांगितले . यावेळी विकी इंगळे यांनी आपण रेल्वे हॉस्पिटलमध्ये डिव्हिजन डॉक्टर असल्याचं सांगत आपले ओळखपत्र दाखवले. मात्र टीसीला त्याच्यावर संशय आला त्यांनी याबाबत कल्याण जीआरपी व आरपीएफला माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली असता त्याचे ओळखपत्र बनावट असून तो बोगस डॉक्टर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं . त्यांनी विकी इंगळेला ताब्यात घेत त्याच्याकडून स्टेथोस्कोप, रेल्वे व शासनाचे पाच ओळखपत्र जप्त केले. विकी हा एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये कामाला आहे. विकीने हे ओळखपत्र का व कोठून बनवले ,या ओळखपत्राचा गैरवापर केला आहे का ?याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha