Prashna Maharashtrache LIVE : प्रश्न महाराष्ट्राचे; शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे, दादाजी भुसे यांच्या सुचना

Prashna Maharashtra che Abp Majha आज दिवसभर एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये भूमिका मांडतायेत कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse).

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2022 12:40 PM
कांदा उत्पादक अडचणीत, सरकारला जाणीव  

Dadaji Bhuse: कांदा उत्पादकांच्या संदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे हे खरं आहे. सरकारला याची जाणीव आहे. यासंदर्भात प्रयत्न करता येईस. बाहेर कांदा पाठवणे, तसेच कांदा चाळीची निर्मिती करणे. चांगल्या वाणाचा कांदा कसा निर्माण करता येईल, चांगले बियाणे कसे देता येतील याचे प्रयत्न करणार असल्याचे भुसे म्हणाले. 

पीक विम्याच्या बाबतीत बीड  मॉडेल लागू करावं

पीक विम्याच्या बाबतीत बीड  मॉडेल लागू करावे. यामुळे कंपन्यांच्या नफ्याला मर्यादा आहे. हे लागू करावे अशी आमची मागणी केंद्राकडे असल्याचे भुसे यावेळी म्हणाले.2021-22 वर्षात आम्ही नियमांचे पालन करुन, अतिवृष्टी झाले त्यावेळी शेतकऱ्यांना मदत केली. 72 तासात नुकसानीची माहिती द्यावी हा नियम 

तरुण शेतकऱ्यांच्या सुचनांचे आम्ही स्वागत करु : दादाजी भुसे

तरुण शेतकऱ्यांचे सुचनांचे आम्ही स्वागत करु असेही भुसे म्हणाले. कोरोना वाईट होता. त्यातून काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. लहान गावामध्येही शेतकरी पिकवलेला माल ग्राहकांना विकत होता. काही मुलांनी अॅप तयार केले. ऑनलाईन माध्यमातून शेतमाल ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. लहान लहान प्रयोग केले, ते यशस्वी झाले असेही भुसे यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे

Dadaji Bhuse : बँका कर्ज देत नाहीत. राष्ट्रीयकृत बँका कर्ज देताना जरा आखडता हात घेत आहे. प्रत्येक जिल्ह्यात मी सांगितले आहे की, शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे.  वेळेवर पीक कर्ज दिले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. ज्या बँका आखडता हात घेत आहे, त्यांची भुमिक चुकीची असल्याचे दादाजी भुसे म्हणाले. 

बियाणे, रासायनिक खते यावर्षी कमी पडणार नाहीत

Dadaji Bhuse : बियाणे, रासायनिक खते यावर्षी कमी पडणार नाहीत. केंद्रीय कृषीमंत्री तोमर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्र्यांची भेट आम्ही घेतली आहे. खतांचे वाढलेले दर कमी करावे अशी विनंती आम्ही कली आहे असे भुसे म्हणाले. 

चुकीच्या दराने बियाणांची विक्री होत असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार : दादाजी भुसे

Dadaji Bhuse :  रासायनिक खतांच्या संदर्भात तक्रारी येत आहेत. त्याची मी दखल घेतले आहे. आज त्याचे रिझल्ट दिसतील. ज्यादाच्या भावाने, चुकीच्या दराने विक्री होत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. तसे आदेश दिले आहेत असे दादाजी भुसे म्हणाले. 

पार्श्वभूमी

Prashna Maharashtra che : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. यासह विविध प्रश्नांवर आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा होणार आहे. या चर्चेत भूमिका मांडतायेत कृषीमंत्री दादाजी भुसे....


राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग


या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.


दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.


कुठे पाहाल कार्यक्रम


हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.