मुंबई : आमचा एक ओबीसी (OBC) नेता पडला तर 160 मराठा आमदार पाडणार असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी म्हटलं. सध्या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये (Maratha) बराच संघर्ष पाहायला मिळतोय. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण घेणार असल्याचा निर्णय घेतलाय. त्यातच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) घेऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. मराठा समाजाला जो निधी दिला तसाच निधी ओबीसी समाजाला द्यावा. तसेच ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जर सरकारने योग्य तोडगा काढला नाही, तर त्यासाठी सरकारच जबाबदार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं.


20 जानेवारी रोजी मराठा समाजाकडून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. यावर प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं की, 20 तारखेला मराठा समाज मुंबईत येऊन टोकाची भूमिका घेणार आहे. पण आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा 20 तारीखेपासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत. मराठा समाजापूर्वी आम्ही आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मागितली असल्याचा दावा देखील प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केलाय. 


त्यासाठी सरकार जबाबदार असेल - प्रकाश शेंडगे


मराठा समाजाकडून मुंबईत आंदोलनाचा हाक देण्यात आलीये. त्यासाठी मराठा समाजाकडून आझाद मैदानाची मागणी करण्यात आलीये. तसेच ओबीसी समाजाकडून देखील आझाद मैदानासाठी आग्रह धरला जातोय. आझाद मैदानात मराठा समाजाला  परवानगी देऊ नये, त्यामुळे दोन्ही समाजात वाद होईल आणि यासाठी सरकारच जबाबदार असल्याचं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे. 


मराठा समाजासाठी जी समिती नेमली त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार


ओबीसी समाजाला एक न्याय आणि मराठा समाजाला एक न्याय का असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केलाय. तसेच त्यांच्या समितीसाठी निधी देतात मग ओबीसी जनगणना का करत नाही या प्रश्न देखील प्रकाश शेंडगेंनी विचारला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण फेटाळला आहे. मग परत परत सर्वेक्षण का करतायत. आम्ही या प्रकरणी कोर्टात जाऊ.  मराठा समाजासाठी जी समिती नेमली त्याच्या विरोधात  कोर्टात जाणार. 54 लाख दिलेले कुणबी दाखले आम्हाला मान्य नसल्याचं प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


हेही वाचा : 


MLA Disqualification:  कौल कोणाला? विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात होणार निर्णय, अवघ्या काही तासांत राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार