एक्स्प्लोर

शेतमजुराचा पोस्ट तिकिटांचा संग्रह, दोन कोटींची ऑफरही धुडकावली

काही वर्षांपूर्वी त्याच्याकडील तिकिटांचा संग्रहाची माहिती घेऊन कोलकात्याच्या एका डॉक्टरने फोन करून सर्व तिकिटांचा संग्रह दोन कोटी रुपयांना मागितला होता. हातावर पोट असणाऱ्या कोणालाही ही रक्कम फारच मोठी असते, मात्र तरीही महादेव यांनी आपली जपलेली आवड विकण्यास नकार दिला.

सोलापूर : प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणता ना कोणता छंद जोपासत असतो. शहरी भागात लहानपणापासून मुलांना असे छंद जोपासायची सवय लागलेली असते. मात्र माढा तालुक्यातील लऊळसारख्या ग्रामीण भागातील एका शेतमजुराने जोपासलेला देशी-विदेशी पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह खरंच कौतुकास्पद आहे. महादेव डांगे यांची माढा तालुक्यातील लऊळ येथे 22 गुंठे शेती आहे. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने शाळकरी वयापासून मजुरीची सवय असलेले महादेव यांना चौथीमध्ये शिकत असताना पोस्टाच्या तिकिटाचे महत्व एका प्रसंगावरून समजले आणि तेव्हापासून त्यांना ही तिकिटे संग्रह करण्याचा नादच लागला. गेली 40 वर्षे महादेव यांनी हा छंद जपला जोपासलाच नाही, तर या तिकिटांसाठी आलेली लाखो रुपयांची ऑफर धुडकावून त्यांनी पुढच्या पिढीसाठी हा संग्रह जपून ठेवला आहे. शेतमजुराचा पोस्ट तिकिटांचा संग्रह, दोन कोटींची ऑफरही धुडकावली महादेव डांगे यांचे कुटुंब लऊळ जवळील एका वस्तीवरील झोपडीत राहतात. वडिलोपार्जित 22 गुंठे शेतीत कुटुंबाचा चरितार्थ चालणे अवघड असल्याने मुलगा आणि महादेव हे दोघेही मजुरीचे काम करतात. महादेव हे चौथीमध्ये असताना त्यांना एक पोस्टाचे जुने तिकीट मिळाले होते. हे तिकीट त्यांच्याकडून एकाने दीड रुपायाला विकत घेतले आणि ही तिकिटं खूपच मौल्यवान असतात. याचा महादेव यांना साक्षात्कार झाला. मग लऊळसारख्या भागात राहूनही शाळकरी महादेव यांनी तिकिटं गोळा करण्यास सुरुवात केली. तरुणपणी कामासाठी महादेव पुण्यात स्थलांतरित झाले. इथे काम करताना अशी पुरातन तिकिटांच्या शोधातच असे. पेंटिंगचे काम करताना पुणे आणि परिसरात  लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत त्यांच्याकडून मजुरी कमी मिळाली तरी घ्यायची, मात्र त्यांच्याकडे असलेल्या जुन्या पाकिटांवरील तिकिटे मात्र ते न लाजता मागून घेत. महादेव यांची ही आवड पाहून पुण्यातील कॅम्प परिसरात काम करताना, त्यांना अनेक विदेशी तिकिटे मिळाली. महादेव यांची आवड पाहून पुण्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याने त्यांच्याजवळील काही जुनी तिकिटांचा संग्रह दिल्यावर आभाळाला गवसणी घातल्याचा आनंद महादेव याला झाला. काही दिवसातच महादेव यांच्याकडे भारत, पाकिस्तान, इंग्लंड, फ्रांस, आफिका अशा अनेक देशातील पुरातन तिकिटांचा संग्रह तयार झाला. काही वर्षांपूर्वी त्याच्याकडील तिकिटांचा संग्रहाची माहिती घेऊन कोलकात्याच्या एका डॉक्टरने फोन करून सर्व तिकिटांचा संग्रह दोन कोटी रुपयांना मागितला होता. हातावर पोट असणाऱ्या कोणालाही ही रक्कम फारच मोठी असते, मात्र तरीही महादेव यांनी आपली जपलेली आवड विकण्यास नकार दिला. शेतमजुराचा पोस्ट तिकिटांचा संग्रह, दोन कोटींची ऑफरही धुडकावली आज महादेव यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. गेली 40 वर्षे जपलेला आपला हा संग्रह शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहावा याची माहिती घ्यावी हा त्यांचा उद्देश होता. आता ते पुन्हा आपल्या लऊळ या गावी येऊन पुन्हा आपल्या भागात मजुरी करू लागले आहेत. आता त्यांचा मुलगाही मजुरीला जातो, पण हे तिकिटांच्या संग्रहाचे त्यांचे वेड आजही तसेच आहे. आजही महादेव आणि त्यांच्या पत्नीने हा संग्रह झोपडीतील एका पेटाऱ्यात जपून ठेवला आहे. आपला संग्रह ग्रामीण भागातील मुलांनी पाहावा आणि त्यातून माहिती घ्यावी ही त्यांची इच्छा असली तरी आजच्या मोबाईलच्या जमान्यात महादेव यांच्या तिकिटांचा संग्रह या मुलांसाठी आजही आऊट ऑफ कव्हरेज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti: आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget