एक्स्प्लोर

सांगलीत कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या आजाराच्या उपचारासाठी पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू

कोविड मधून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना इतर आजार उद्भवत आहे. अशा रुग्णांसाठी सांगली येथे पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे.

सांगली : कोविड आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना पुन्हा काही वेगवेगळे त्रास होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना तपासणे व आवश्यक औषधोपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोविड मधून बरे झाल्यानंतर काही त्रास उदभवणाऱ्या रूग्णांना सेंटर अतिशय महत्वाचे ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

सांगली जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णाचा आलेख आता दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. मात्र, कोरोनाचे संकट आजही कायम आहे. मार्चपासून आज अखेर जवळपास 40 हजार जण कोरोना बाधित झाले. त्यापैकी 34 हजार जण कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांमध्ये इतर आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या वतीने पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

सांगलीत कोविड सेंटरमधून पळालेल्या आरोपींना पोलिसांना केले जेरबंद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे पोस्ट कोविड-19 बाह्यरूग्ण विभागाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर मूर्ती, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्ता भोसले आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे मार्चपासून डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल म्हणून काम करीत आहे. या ठिकाणी पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू केले असून आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. कोविड आजारातून बरे झाले आहेत. त्यापैकी कोणालाही काही त्रास होत असल्यास त्यांच्याकरिता सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पोस्ट कोविड ट्रिटमेंट सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार पुढे आणखी दिवसही वाढवू शकतो. याचा खूप मोठा फायदा रूग्णांना होईल, असे मत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाचा तंतूवाद्य व्यवसायाला मोठा फटका, मिरजेतील वाद्य बनवणारे कारागीर संकटात, लाखोंचं नुकसान

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget