एक्स्प्लोर
मी ‘महाजन’ असली, तरी राजकारणात खूप त्रास झाला : पूनम महाजन

नागपूर : “मी महाजन असली, तरीही मला राजकारणात आल्यावर खूप त्रास झाला.”, असे भाजयुवामोच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. नागपुरातील कार्यकारिणीची घोषणा आणि युवा शक्ती संमेलनासाठी पूनम महाजन उपस्थित ह होत्या. राजकारणात अनेक वेळा मनासारखे होत नाही, असेही सांगायला पूनम महाजन विसरल्या नाहीत. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात घेण्यात आला. येत्या महानगरपालिकेच्या प्रचाराचा बिगुलसुद्धा भाजपाने इथेच वाजवला. या संपूर्ण युवाशक्तीला मागच्या पाच वर्षात महानगर पालिकेने काय कामं केली आणि जनतेत काय पुढे न्यायचे आहे, याचे धडे या कार्यक्रमातून देण्यात आले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























