एक्स्प्लोर

Pooja Chavan suicide case | मुलीच्या मृत्यूमुळे उठलेल्या वादंगावरुन पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Pooja Chavan suicide case | मुलीच्या मृत्यूमुळे सुरु असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत माझ्या मुलीचा मृत्यू आर्थिक विवंचनेतून झाला असल्याची प्रतिक्रिया पूजाच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तसेच व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाजही पूजाचा नसल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलंय.

बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला सध्या राजकीय वळण मिळालं आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे. पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बातचित करताना त्यांनी माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचं म्हटलं आहे. तसेच ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज होतं, असंही ते म्हणाले आहेत.

पूजा चव्हाणच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "खूप वाईट वाटलं. आम्ही तिथे साडेआठ-नऊच्या दरम्यान पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर कळालं की, पूजा आमच्यात नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ती बिल्डिंगवरुन पडली आहे आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिथे गेल्यावर कळालं आम्हाला ती आपल्यात नाही. ऐकल्यावर खूप धक्का बसला. काय करावं, काहीस समजत नव्हतं. तिथे माझ्यासोबत कोणीच नव्हतं. त्यानंतर नातेवाईक आले."

"मला बीपीचा त्रास आहे. त्यामुळे सर्व कामं, व्यवहार पूजा पाहायची. माझ्या मुलीच्या नावावर मी पोल्ट्री साठी कर्ज घेतलं होतं. जवळपास 17 ते 18 लाखांचं कर्ज होतं. लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली होती. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईकांकडून पैसे घेऊन सावरण्याचा प्रयत्न केला. तर बर्डफ्लू आला. त्यामुळे पूजा तणावात होती. एवढे पैसे फेडायचे कसे? हा तिच्यासमोर प्रश्न होता." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी पूजाला त्यावेळी धीर देण्याचा प्रयत्न केला होता. तिला मी सांगितलं होतं, मी आहे पूजा. पण ती म्हणायची, पप्पा मी काय करू? मी आता जाऊन क्लास करुन येते. मला इथे बसून टेन्शन खूप येतंय. पैसे एवढे द्यायचे कसे? बँकेचे मेसेज येत आहेत, हफ्ते भरायला सांगत आहेत."

पाहा व्हिडीओ : Pooja Chavan Suicide Case|मुलीच्या मृत्यूमुळे उठलेल्या वादंगावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया EXCLUSIVE

"आम्ही खूप निवेदनं दिली. कलेक्टरांना, तहसीलदारांनी, पण कुणीच लक्ष दिलं नाही. लक्ष दिलं असतं तर माझी मुलगी गेली नसती. पूजा कधीच स्वतःचं दुःख दुसऱ्याला दाखवत नव्हती. तिचा स्वभाव होता. दुःख न दाखवता बाजूला जाऊन ती रडायची गपचूप. कळू द्यायची नाही मी रडायची म्हणून. डोळे पुसून पुन्हा येऊन माझ्याशी बोलायची." , असं त्यांनी सांगितलं.

सध्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "हे राजकारणंही असू शकतं. माझ्या मुलीला नाहक बदनाम केले जात आहे. कोणासोबत तरी माझ्या मुलीचं नाव जोडून काही लोक मुद्दामून आमची बदनामी करत आहेत. आमचा समाज म्हणतोय हे राजकारण आहे. माझी बदनामी होण्यासाठी. तो आवाजही आमच्या मुलीचा नाहीये. माझी मुलगी तर गेली ना, माझं काय आहे? पण आता माझी बदनामी थांबवली पाहिजे आता. त्यांना काय मिळतंय, काय साधत आहेत. ज्याला दुःख झालंय त्याला हे आणखी दुखवत आहेत. आई-वडिलांची अवस्था काय आहे. तिची आई बेशुद्ध आहे. कोणाला काय सांगावं काहीच कळत नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "खूप मोठा डोंगर आहे कर्जाचा. पैसे द्यायचे कसे? पोल्ट्री व्यवसाय बुडाल्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे. फक्त माझीच नाही, संपूर्ण भारतात अशीच परिस्थिती आहे."

कुणाचंही नाव घेणं चुकीचं आहे. उगाच विनाकारण कोणाचंही नाव का घ्यायचं : पूजाचे वडिल

वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जातंय यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "असं कुणाचंही नाव घेणं चुकीचं आहे. उगाच विनाकारण कोणाचंही नाव का घ्यायचं? पोलिसांचं काम आहे, ते चौकशी करु शकतात. काय खरं आहे, काय खोटंय. त्या ठिकाणी मुलं होती तेदेखील सांगतात की, ती खाली पडली आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. मी सुद्धा पाहिलं डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे." पोलिसांत काय जबाब दिला त्यासंदर्भात बोलताना पूजाच्या वडिलांनी सांगितलं की, "मला पोलिसांनी विचारलं होतं की, तुम्हाला कोणावर शंका आहे का? मी सांगितलं कोणावरच नाही."

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur Ambe Well Accicent : आंबेतील विहीर दुर्घटनेसंदर्भात मोठी अपडेट; आणखी एका कामगाराचा मृतदेह सापडाला; NDRF कडून उर्वरित दोघांचा शोध सुरु 
आंबेतील विहीर दुर्घटनेसंदर्भात मोठी अपडेट; आणखी एका कामगाराचा मृतदेह सापडाला; NDRF कडून उर्वरित दोघांचा शोध सुरु 
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Bhandara Human Wildlife Conflict: भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; 11 महिन्यात 11 जणांचा बळी, तर मागील 20 दिवसात चौघांचा मृत्यू; वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; 11 महिन्यात 11 जणांचा बळी, तर मागील 20 दिवसात चौघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीती, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
Embed widget