Deputy cm Ajit Pawar  : आजपर्यंत देशात, राज्यात कधीही अशी परिस्थिती नव्हती. यापूर्वी कधीही नोटीसा देणं, केंद्रीय यंत्रणांचा वापर करणं असं होत नव्हतं. यावर सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. प्रत्येकाने आपापलं काम करावं, जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांचं काम करावं असेही अजित पवार म्हणाले. पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व द्यावं असेही ते म्हणाले.


आज भाजपच्या होणाऱ्या आंदोलनाबाबत देखील अजित पवार यांना विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले की, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. काल यशवंतराव चव्हण यांची जयंती होती. त्यानिमित्त आम्ही सर्वांनीच त्यांचे स्मरण केले. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी स्विकारली. यावेळी त्यांनी जबाबादारी असणाऱ्या व्यक्तिंनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहजे, जबाबादारी कशी पूर्ण केली पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन कसं गेलं पाहिजे  हे दाखवून दिल्याचे अजित पवार म्हणाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप एकण्यात सामान्य लोकांना अजिबात रस नाही. आमचे प्रश्न सुटावेत याकडे लोकांचे लक्ष असल्याचे अजित पवार म्हणाले. आरोप प्रत्यारोप बंद करुन विकासाला महत्व दिलं पाहिजे आणि त्यातून राज्याचा विकास कसा  होईल याकडं लक्ष द्यायला हवं असे अजित पवार म्हणाले.


पुणे महापालिकेच्या कार्यकारी मंडळाची म्हणजे नगरसेवकांची मुदत आज संध्याकाळी संपत आहे. त्यामुळं पुण्यातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांच्या  प्रभागांमधे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमीपूजनांचा धडाका पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील तब्बल 30 विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन होणार आहे. याची सुरुवात अजित पवारांनी पुण्यातील सुस भागातून सकाळी सात वाजता केली.  तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील साडेअकरा वाजल्यापासून उद्घाटन आणि भूमीपूजनांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रात्री उशिरापर्यंत या नेत्यांचे हे भूमीपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम चालणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुस भागातील महापालिकेच्या विकास कामांच भूमीपूजन केल्यानंतर राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. एकमेकांना लक्ष करणं, नोटीसा देणं ही परिस्थिती याआधी कधीच नव्हती असं अजित पवार म्हणालेत. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काही गोष्टी ठरवायल्या हव्यात असं अजित पवार म्हणालेत.


महत्त्वाच्या बातम्या: