एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोपर्डी बलात्काराच्या गंभीर चर्चेदरम्यान राजकीय चिखलफेक
मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरु असताना काही काळ विषय भरकटला. कोपर्डीसारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यात व्यक्त होते.
कोपर्डी प्रकरणावर चर्चा सुरु असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकार राबवत असणाऱ्या यंत्रणेवर अविश्वास व्यक्त केला आणि विषय थेट एकनाथ खडसेंना मिळालेल्या क्लीन चिटपर्यंत नेला. यानंतर एकनाथ खडसेही गप्प राहिले नाहीत. माझ्या क्लीन चिटमुळे अनेकांच्या थोबाडीत बसली, असं उत्तर खडसेंनी विखेंना दिलं.
मात्र नेमकी कुणा-कुणाच्या थोबाडीत बसली, त्यांची नावंही खडसेंनी जाहीर करुन पटलावर ठेवावीत, आमची नावं त्यात नाही हे नक्की, असा मिश्लिल टोला राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंना लगावला.
काही काळ आरोप प्रत्यारोप, चिखलफेक झाल्यानंतर पुन्हा कोपर्डी प्रकरणावर चर्चा सुरु झाली. परंतु चर्चा सुरु असताना काँग्रेसने कोपर्डीसारख्या गंभीर विषयाला राजकीय रंग दिला. त्यामुळे विरोधकांना तरी याप्रकरणाचं गांभीर्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement