एक्स्प्लोर
नगरमध्ये पोलिस व्हॅनला अपघात, 11 पोलिस जखमी
अहमदनगर येथे बंदोबस्तासाठी जळगावमधून पोलिस आले होते.

नेवासा : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पोलिस व्हॅनचा अपघात झाला आहे. या अपघातात 11 पोलिस जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कंटेनरला पोलिसांची व्हॅन धडकली. माळीचिंचोरे गावाजवळ ही दुर्घटना घडली.
या व्हॅनमध्ये एकूण 17 पोलिस कर्मचारी होते. अहमदनगर येथे बंदोबस्तासाठी जळगावमधून पोलिस आले होते.
दरम्यान, जखमी पोलिसांना नेवासे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
