औरंगाबाद/लातूर : भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर राज्यात असंतोषाचा भडका उडाला. साहजिकच दलित चळवळींची भूमी असलेल्या मराठावाड्यात याचं प्रामण अधिक होतं. मात्र या संकटाच्या स्थितीतही पोलीसांनी तब्बल 72 तास कर्तव्य बजावलं.


सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर सध्या औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातील उस्मानपुरा भागात कर्तव्यावर असताना त्यांचा छातीवर दगड लागला. मार एवढा जबर होता, की त्यांना तत्काळ रूग्नालयात हलवलं.  गेल्या दोन दिवसात औरंगाबादेत झालेल्या 50 दगडफोकीच्या घटनेमध्ये केवळ कोळेकरच नाही, तर तर एक डीसीपी, 2 एसीपी, 3 पीआयसह 41 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

औरंगाबादेतील 3 हजार पोलिसांच्या फौज फाट्याने आदल्या दिवशी थर्टी फर्स्टसाठी रात्रभर पहारा दिला. पोलीस कर्मचारी ड्युटी संपवून घरी पोहोचत होते. तोवर भीमा-कोरेगावचे पडसात शहरात उमटण्यास सुरुवात झाली. औरंगाबद दलित चळवळींची भूमी आहे. त्यामुळे या घटनेचे पडसात सर्वप्रथम शहरात दिसायला सुरुवात झाली.

1 जानेवारीला संध्याकळी 5 वाजता उस्मानपुरा भागातून एक मोठा जमाव घोषणा देत निघाला. पोलिसांनी माहिती मिळताच त्या जमावाला रोकण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांचा जामाव शांत होत नव्हता. तोडफोडीला सुरुवात झाली. याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. सिडोको भागातील आंबेडकर नगर , टिव्ही सेंटर भागातही हजारोंच्या संखेने लोक रस्तावर होते आणि त्यांना समजावण्याचं काम करत होते अवघे काही पोलीस..

यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोर दोन आव्हाने होती, एक जमावाला पांगवणं आणि जमाव पांगवताना कुठलाही अनूचित प्रकार घडू नये, जेणे करून आलेल्या संकटात भर पडेल.

शहरात हजारोंचा जमाव जमला.. 50 ठिकाणी दगडफेक, 34 अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या, 53 फायबर बुलेटचा वापर केला, 15 ठिकाणी लाठीचार्ज केला गेला.. 74 लोकांना दोन दिवसात अटक करण्यात आली, त्यामुळे शहरात काय चित्र होतं हे डोळ्यासमोर उभ राहिलं. मात्र या सगळ्याला सामोरे गेले ते पोलीस प्रशासन. यावेळी पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनवर टिकाही झाली.मात्र पोलिसांनी अविरतपणे 72 तास बजावलेलं कर्तव्य सलाम करण्यासारखंच आहे.

लातूर जिल्ह्यातही पोलीस कर्मचारी जखमी

निलंगा पोलिसातील दहा कर्मचारी महाराष्ट्र बंदच्या वेळी झालेल्या दगडफेकीत जखमी झाले. निलंग्याच्या उप जिल्हा रुग्नालयात यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे पोलीस कर्मचारी 24 तासांपैकी 18 – 18 तास ड्युटी करत आहेत.  दापका वेस भागात दोन गटात वाद झाला. त्यात तुफान दगडफेक झाली. यात काही पोलिसांची डोकी फुटली, काहींच्या डोळ्याला मार लागला आहे.

31 डिसेंबरसाठी रात्रभर ड्युटी, त्यानंतर ही तणावपूर्ण परिस्थिती हाताळणं यामुळे पोलिसांना घरी जाणं तर सोडाच पण कर्तव्यावर असतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आंदोलनांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस पहारा देतात. मात्र अशा वेळी झालेल्या हिंसाचारात सर्वात मोठा फटका पोलिसांनाच बसतो.