Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) लाचखोरीच्या (Bribe) वाढत्या घटना चिंताजनक बनल्या असून रोज कुठल्या ना कुठल्या विभागातील एक तरी अधिकारी किंवा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली होती. अशातच नाशिकच्या पोलीस प्रशासनातील पोलीस उपनिरीक्षकास पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 


नाशिकमध्ये लाचखोरीचा (Nashik) भस्मासुर बोकाळला असून गेल्या काही दिवसात सातत्याने लाचखोरीचे प्रकरण उघडकीस येत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये दोन तलाठ्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. अशातच नाशिकच्या पोलीस (Nashik Police) दलातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. गणपत काकड असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.


दरम्यान तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police) गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणपत काकड यांनी तक्रारदाराकडे पाच जुलै 2023 रोजी 25 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 15000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक काकड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस गणपत काकड हे लाच स्वीकारत असताना त्यांना पकडले. या कारवाईने नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काकड हे एसीबीच्या कोठडीत आहेत. तसेच नाशिकरोड पोलीस छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.


सात महिन्यात निवृत्त.... 


दरम्यान तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने नेहमीप्रमाणे सापळा रचून काकडला तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे काकडला खात्यांंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली होती. सेवानिवृत्तीला सात महिने बाकी असताना तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी होत्या. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या निरीक्षक गायत्री जाधव, प्रकाश महाजन, ज्योती शार्दूल यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.


इतर महत्त्वाच्या बातम्या: