एक्स्प्लोर

पोलिसांना महाराष्ट्रात मनपसंत ठिकाणी बदली

राज्याचा गृहविभाग पोलिस कर्मचार्‍यांच्या सेवाशर्तीमध्ये लवकरच सुधारणा करणार आहे. त्यामुळे पोलिसांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदली करुन घेता येणार आहे.

मुंबई : पोलिसांच्या कामाचे तास आणि ताण यामुळे अनेकदा कुटुंबाकडे लक्ष देणं कठीण जातं. त्यातच जर पोलिसांची बदली घरापासून दूर झाली असेल, तर वैयक्तिक आयुष्याचं गणित जमवणं जिकीरीचं होतं. यामुळे राज्याच्या गृहविभागाने पोलिसांना मनपसंतीच्या जिल्ह्यात बदली देण्याचा निर्णय घेतला आहे. 'दैनिक पुढारी' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. इच्छित ठिकाणी बदली करुन घेण्यासाठी पोलिस शिपायांना अनेकदा पोलिस कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. इतकंच नाही, तर काही जण चिरीमिरी द्यावी लागत असल्याचंही सांगतात. मात्र राज्याचा गृहविभाग पोलिस कर्मचार्‍यांच्या सेवाशर्तीमध्ये लवकरच सुधारणा करणार आहे. त्यामुळे पोलिसांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदली करुन घेता येणार आहे. एखाद्या जिल्ह्यात पोलिस भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यावर इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज करतात. पोलिस भरती झाल्यानंतर हे कर्मचारी दोन ते तीन वर्षांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये बदलीसाठी अर्ज करतात. त्यासाठी कार्यालयांमध्ये खेटा घालाव्या लागतात. बदलीच्या प्रयत्नांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. त्याचा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तर होतोच, मात्र कुटुंबीयांपासून दुरावल्यामुळे त्यांचं मनस्वास्थ्यही बिघडू शकतं. आवश्यक वेळी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबतच्या 2011 च्या पोलिस सेवाशर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. गडचिरोलीसारख्या भागात नोकरी लागल्यानंतर पोलिस कर्मचारी बदल्यासाठी अर्ज करतात. अर्जासोबत खोटे दाखले किंवा बदली होण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी येतात. भरती झालेल्या जिल्ह्यातुन बदल्या केल्या जात असल्यामुळे  पुन्हा अनुशेष निर्माण होत असल्यामुळे भरती प्रक्रिया राबवावी लागते. यात शासनाचा लाखो रुपये खर्च होतो. पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे अधिकार उच्च अधिकार्‍यांना दिले आहेत. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget