एक्स्प्लोर

कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्याचा पोलिसांवर हल्ला, पाच संशयितांना अटक

कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. टवाळखोरांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन ठिकाणी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जीवबा नाना पार्क इथल्या हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील 10 ते 12 जणांच्या टोळक्याने पोलिसांवर हल्ला केला. ज्यात करवीर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईसाठी गेले असता, पोलिसांवर हा हल्ला झाला. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूरच्या जिवबा नाना पार्क परिसरात अविनाश गवळी, अभिजित जिरगे, विलास पाटील हे तिघे मद्यधुंद अवस्थेत होते. धिंगाणा सुरु झाल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिस आले पण या तिघांनी पोलिसांवर हात उचलला. यामध्ये फौजदार दत्तात्रय शिंदे यांच्या हाताला मार लागला. धिंगाणा घालण्यामध्ये हे तिघेच नव्हते तर यांचे काही साथीदार देखील त्याठिकाणी होते.मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेत असून जिवबा नाना परिसरात गस्त वाढवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दुसरीकडे राजारामपुरी परिसरातही मद्यधुंद अवस्थेमधील दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. जनता बाजार चौकात ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केल्याने दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. दरम्यान, कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. टवाळखोरांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशांततेचं वातावरण निर्माण होतंय की काय अशी शक्यताही वर्तवली जात आहे. कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला झाल्याची ही पहिली घटना नाही. या आधीही कारवाईसाठी गेलेले पोलिस, वाहतूक शाखेचे पोलिस यांच्यावर हल्ले झाले आहेत. अनेक टोळ्या हद्दपार झाल्या आहेत. मात्र तरीही कोल्हापूर काही शांत होण्याचं नाव घेत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Jain Muni Nileshchandra on Raj Thackeray: तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Embed widget