गेल्या दोन तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर व्हायरल झालेला जेसीबीच्या साहाय्याने बैलास क्रूरतेने ठार मारलेल्या व्हिडिओने अनेकांची मने पिळवटुन टाकली होती. हा व्हिडिओ नेमका कुठल्या गावचा असा प्रश्न सर्वांना पडला होता. हा व्हिडिओ इंदापूर तालुक्यातील अडवळणी असलेल्या पोंधवडी गावचा आहे. यासंबंधीत बातमी एबीपी माझाने दाखवत यातील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी त्याचा पाठपुरावाही केला होता. याची दखल घेत यातील आरोपीला अटक केली आहे.
जेसीबीने चिरडुन बैलाची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीसांना लागला. गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे आणि भाऊसाहेब आण्णा खारतोडे यांच्याविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला. यात फिर्यादी स्वतः पोलीस बनले. काल यातील रोहित शिवाजी आटोळे यास पोलिसांनी अटक केली. ज्या जेसीबीने बैलास चिरडले तो जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर भाऊसाहेब आण्णा खारतोडे याच्या शोधात पोलिस आहेत
बैलाला पिसाळलेलं कुत्र चावल्यामुळं बैल पिसाळला होता. त्यामुळं गावातील रस्त्यावरील लोकांच्या पाठीमागे धावणे, समोर येईल त्याला ढुसण्या मारणे, यामध्ये बैलाने चार दुचाकींची मोडतोड केली होती. गावकऱ्यांच्या अंगावरही तो जात होता. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ होऊ नये, म्हणून गावकऱ्यांनी त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. माणुसकीला काळीमा फासणारा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, अखेरीस बैलाचा बळी घेणारा आणि हा व्हिडिओ व्हायरल करणारा समाजासमोर आला. दरम्यान, बैल खरंच पिसाळला होता का? याचे उत्तर शोधण्यासाठी पुरलेला बैल उकरुन पशुवैद्यकीय विभागाने त्याचे शवविच्छेदन केले.
संबंधित बातम्या -
नांगरणी स्पर्धा बंद होण्याची भीती, गुहागरमध्ये प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याप्रकरणी आमदार पुत्रासह 25 जणांविरुद्ध गुन्हा
CCTV VIDEO | मुंबई आयआयटीतील इंटर्न बैलाच्या धडकेत जखमी
कुर्बानीला आणलेला रेडा झाला वेडा, वाहनांची तोडफोड
Bull murdered brutally | पिसाळलेल्या बैलाची जेसीबीने हत्या केलेल्यांना अटक | ABP Majha