एक्स्प्लोर

पुणे मेट्रोचं आज भूमिपूजन, मोदी-पवार पुन्हा एकाच मंचावर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाआधीच काँग्रेसने, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतलं. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी हजर होते. आधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का? दरम्यान, भाजपने पुणे मेट्रोआधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का केलं असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र महापालिकेने पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं ठरवलं असताना मोदींच्या हस्ते उद्घाटन का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. पुणे मेट्रोचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते व्हावं, असा ठराव महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानेच मंजूर करण्यात आला होता. मात्र पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपसोबत दिलजमाई केली. या निर्णयावरुन यू टर्न घेत शरद पवार केवळ कार्यक्रमाला उपस्थित असतील, यावरच सहमती दर्शवली, असा आरोप रमेश बागवे यांनी केला आहे. भाजप-राष्ट्रवादीचा वाद पुणे मेट्रो भूमिपूजनवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद सध्या निवळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे 23 डिसेंबरचा पुणे मेट्रो भूमिपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करत असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमिपूजन करणार, असा इशाराही पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिला होता. पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी पिंपरीत बॉम्बसदृश्य वस्तू पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक असताना, तिथून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या पिंपरी येथे बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहाणार आहेत. विश्वनाथ साळुंखे नावाच्या व्याक्तीकडे ही स्फोटके आढळून आली आहेत. या वस्तू कमी तीव्रतेच्या असल्या तरीही एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या आहेत.

संबंधित बातम्या

मोदींआधीच काँग्रेसकडून पुणे मेट्रोचं भूमिपूजन संपन्न!

पुणे मेट्रोचं भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करणार : काँग्रेस

पुणे मेट्रोचं मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भूमीपूजन करणार, राष्ट्रवादीचा इशारा

पवार-मोदी 24 डिसेंबरला व्यासपीठावर एकत्र येणार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचं उपोषण मागे, सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री 1.15 वाजता काय घडलं?
मनोज जरांगेंचं उपोषण मागे, सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री 1.15 वाजता काय घडलं?
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
Embed widget