एक्स्प्लोर

PM Modi Pune Visit Devendra Fadanvis : पुण्याला उत्तम नाही तर सर्वोत्तम करु; फडणवीसांचं पुणेकरांना आश्वासन

Devendra Fadanvis : जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांनीच पहिल्या मेट्रोचं उद्घाटन केलं आणि आज दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे ही मोठी गोष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

PM Modi Pune Visit Devendra Fadanvis : जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी (PM Modi Pune) यांनीच पहिल्या मेट्रोचं उद्घाटन केलं आणि आज दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे ही मोठी गोष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी म्हटलं आहे. पुण्याला उत्तम नाही तर सर्वोत्तम करु, असं आश्वासन पुणेकरांनी त्यांनी दिलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या वेळी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मी होतो. मात्र त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या भूमिकेत होतो मात्र सगळ्यांच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत."

आगामी काळात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, हे पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असं ते म्हणाले. पुणे ही जशी उद्योग नगरी आहे तशीच स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणूनही आम्ही पुण्याचा विकास करु, असाही विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला आहे. पुणे हे राज्यातीलच नाही तर देशातील उत्तम शहर आहेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वोत्तम पुणे करुन दाखवू, असंही ते म्हणाले. 

पुणे मेट्रोमुळे अनेकांना फायदा होणार

पुणे मेट्रोमुळे अनेकांना फायदा होणार आहे. ज्या दोन मार्गिका आता तयार करण्यात आल्या आहेत. त्या मार्गिका दोन मार्गांना क्रॉस होणाऱ्या आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचा प्रवास सोपा होणार आहे. ज्यावेळी मेट्रोचे सर्व मार्ग तयार होतील त्यावेळी पुण्यातील वाहतुकीची समस्या कमी होईल, असं देखील त्यांनी सांगितलं. मेट्रोसोबतच पुणे PMPML बाबत निर्णय घेत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस घेतल्या. आज देशातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लिट ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. कोणतंही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दिली पाहिजे, असं मोदींचं स्वप्न आहे. हिच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वात आधी पुण्यात होत आहे. ही पुण्यासाठी आणि राज्यासाठी चांगली बाब असल्याचं ते म्हणाले. 

पुण्य़ाला स्वप्नपूर्तीची नगरी अशी ओळख निर्माण करुन देऊ!

पिंपरी-चिंचवडच्या वेस्ट एनर्जीची 2018 साली सुरुवात केली. त्याचा देखील पुण्याला फायदा होणार आहे. याच ठिकाणी पुण्याला गती देणाऱ्या अनेक योजनांचं लोकार्पण होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक घरं सुपूर्द केली जाणार आहे. यातूनच मोदींचं एकही व्यक्ती बेघर राहणार नसल्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी पुणे प्रशासन निश्चितपणे कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी पुणेकरांना दिला आहे. पुणे हे सांस्कृतिक नगरीसोबतच औद्योगिक नगरीदेखील आहे आणि स्टार्टअप नगरी आहे. पुण्याला स्वप्नपूर्तीची नगरी अशी ओळख निर्माण करुन देऊ, असंही ते म्हणाले. 

हेही वाचा-

PM Narendra Modi Pune Visit Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाले जगभरात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
IPO Listing: दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Raj Kapoor : जेव्हा नर्गिस यांनी राज कपूरसाठी थेट तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
जेव्हा नर्गिस यांनी विवाहित राज कपूरसाठी तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meeting : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीलाShambhuraj Desai : उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या केबिनमध्ये असताना शंभूराज देसाईंची एन्ट्रीUddhav Thackeray Meets Devendra Fadnavis :उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेटीचा, EXCLUSIVE VIDEOUddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
IPO Listing: दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Raj Kapoor : जेव्हा नर्गिस यांनी राज कपूरसाठी थेट तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
जेव्हा नर्गिस यांनी विवाहित राज कपूरसाठी तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Priyanka Gandhi : काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Embed widget