PM Kisan Samman Nidhi Yojana 10th instalment : पीएम किसान (PM Kisan Scheme ) योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1.05 शेतकऱ्यांच्या खात्यात आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 3828 कोटी रूपये जमा होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वत:च्या ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये प्रंतप्रधानांनी म्हटले आहे की, नवीन वर्षाचा पहिला दिवस देशातील अन्नदात्यांना समर्पीत असेल. दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पीएम-किसान योजनेचा दहावा हप्ता जमा करण्याचे भाग्य लाभेल.
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. 28 डिसेंबर 2021 अखेर 15987.98 कोटींची रक्कम महाराष्ट्रातील 108.70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. 1 डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांतील दोन हजार रूपयांचा हप्ता आज दुपारी पंतप्रधानांच्या हस्ते जमा होईल.
असे चेक करा तुमच्या खात्याचा स्टेटस
PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
कोणाला मिळणार पैसे?
या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.
महत्वाच्या बातम्या