नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा फायदा मिळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. पण आता या दोन हजार रुपयांच्या ठिकाणी पाच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. या अतिरिक्त तीन हजार रुपयांच्या लाभासाठी आपल्याला पीएम किसान मानधन योजना (PM kisan Maandhan Pension Scheme) मध्ये रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 

Continues below advertisement


वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन
केंद्र सरकारने पीएम किसान मानधन योजना सुरु केली असून त्या माध्यमातून वयाच्या साठीनंतर आता शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान मानधन पेन्शन योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील कोणताही व्यक्ती रजिस्ट्रेशन करु शकतो. 


पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्याचे वय हे साठ वर्षाहून जास्त असेल आणि त्याने पीएम किसान मानधन पेन्शन योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याला प्रत्येक हप्त्यामध्ये अतिरिक्त तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आधी दोन हजारांचा हप्ता मिळायचा तो आता पाच हजार रुपयांचा मिळणार आहे. 


रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय डॉक्युमेन्टस् हवेत?
या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, ओळख पत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचा एक फोटो आवश्यक आहे.


पीएम किसान योजनेचे आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात दहावा हप्ता जमा होणार आहे. 


संबंधित बातम्या :