अमरावती : प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग करुन रस्त्याची निर्मिती करण्याचा अभिनव प्रयोग स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी साकारला आहे. विदर्भ युथ सोसायटीच्या प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरत रस्त्याची प्रायोगिक तत्वावर निर्मिती केली आहे. महाराष्टात अशाप्रकारचा हा पहिला यशस्वी प्रयोग असून  या  तंत्राचा वापर करण्यासाठी महाराष्ट शासनानाला प्रस्ताव पाठवणार आहे.


 

सध्या डांबरी रस्त्याची दुर्दशा पाहता केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची निर्मिती व्हावी, अशी इच्छा अनेकदा जाहीर केली. परंतु या काँक्रीट रस्त्यांच्या निर्मितीसाठी जास्त खर्च येतो, तसेच डांबरी रस्त्यांची फार दुर्दशा होते. त्याचमुळे कमी खर्चामध्ये तयार होणारा रस्ता हेच लक्ष्य ठेवून स्थापत्य अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांच्या चमूने प्रा. श्रीकांत हरले यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक पेशींचा उपयोग करून रस्त्याची निर्मिती केली.

 



 

सिमेंट काँक्रीट रस्त्यामध्ये जास्त जाडी आणि स्टील गजाचा वापर होतो आणि त्याचमुळे रस्ते बनविण्याचा खर्च वाढतो. परंतु प्लास्टिक पिशव्यांचा ठराविक आकाराचा वापर करून चांगल्या दर्जाचा काँक्रीटचा वापर केल्यास या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी होऊ शकतो. जिथे वाहतूक कमी असते तिथे स्टील गजाचा वापर न करता रस्त्यांची निर्मिती शक्य असल्याचे प्रयोगातून समोर आले.

 

अशा प्रकारचा प्रयोग हा नवीन असून, आम्ही सलग 1 वर्ष यावर काम केले आणि आज हा महाराष्टाचा पहिला प्रयोग आम्ही यशस्वी केलाच आनंद आहे, असे रुपेश केने या विद्यार्थ्याने सांगितले.

 



 

अशा प्रकारे स्टील गजाचा उपयोग टाळून खर्च कमी करता येऊ शकतो. या तंत्रज्ञानावर 'नवीन उपक्रम आणि उद्योजकता विकास केंद्राच्या'माध्यमातून आम्ही दरवर्षी काही  गाव दत्तक घेऊन त्या मध्ये विविध उप्रक आम्ही राबवत असतो मात्र या वर्षी आम्ही एका गाव दत्तक घेऊन त्या गावात प्लास्टिक चा रस्ता आम्ही करू आणि त्या गावात रोजगार निमित्ती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विदर्भ युथ  सोयासतीचे अध्यक्ष नितीन धांडे म्हणाले.