मनमाड : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत नौकानयन स्पर्धेत भारताच नेतृत्व करुन देशाचे नाव या क्रीडा प्रकारात उंचावणाऱ्या तळगाव-रोहीच्या दत्तू भोकनळचा आज त्याच्या गावातील लोकांनी मिरवणूक काढून जंगी सत्कार केला.   नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील तळेगाव-रोही या छोट्याशा गावात सामान्य कुटूंबातील दत्तू भोकनळ आज घरी परताच घरात त्याचे स्वागत झाले आणि सर्वप्रथम त्याने आपल्या आजारी आईला भेटत, तिचे आर्शीवाद घेतले.   सुमारे दीड-दोन तास गावातून फटाके, वाद्याच्या गजरात दत्तूची मिरवणूक सुरु झाली. तळेगावसारख्या दुष्काळी गावात पाण्याची उपलब्धता नसताना दत्तू भोकनाळ याने नौकानयन क्रीडा प्रकाराची निवड केली आणि त्यात त्याने प्राविण्य मिळविले आणि तो थेट ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र झाला. दत्तूला पदक मिळाले नसले, तरी त्याने गावाचे आणि देशाचे नाव मोठं केलं याचा सर्वाधिक आनंद होत असल्याचे गावकरी सांगतात.   नाशिक जिल्हयातील या खेळाडूचा सत्कार करण्यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांच्यासह गावाकडून दत्तू भोकनाळ याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी दत्तूला मदतही जाहीर केली. तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी यापुढील काळासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी मदत करणार असल्याच सांगितलं.   पदक मिळाल्याची खंत नाही मात्र भारताची या खेळाची तीन अंकांनी नंबर पुढे आणू शकले याचा आनंद वाटतो. पण पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत नक्कीच पदक मिळवू असा विश्वास दत्तू भोकनाळ याने या सत्कारानंतर व्यक्त केला.