सैन्यदलात भरती करणाऱ्या दोन एजंटना दिल्लीतून अटक
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 08:49 AM (IST)
नाशिक : नाशिकमधील आर्टिलरी सेंटरमध्ये घुसखोरी प्रकरणी 2 दलालांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या दलालांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सैन्यात भरती केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोन एजंट्सना अटक झाल्याने बनावट कागदपत्र दाखवून लष्करात दाखल करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. हे रॅकेट हरियाणामधून कार्यरत होतं. तसंच बनावट रिक्रूटमेंट सेंटरही हरियाणामध्ये या रॅकेटच्या माध्यमातून चालवलं जात होतं. याप्रकरणी आतापर्यंत एका जवानासोबत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटने दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रभर लष्करभरती केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसंच या रॅकेटने अनेक सेंटर्समध्ये बनावट कागदपत्र देऊन सैन्यात प्रवेश मिळवल्याचंही समोर आलं आहे.