एक्स्प्लोर

अवैध धंद्यांवर 'ड्रोन' स्ट्राईक! पिंपरी चिंचवड पोलिसांच्या प्रयोगाने धाबे दणाणले, राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा

Pimpari Chinchwad Police Drone : अवैध धंद्यांवर टाच आणण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसाकडून ड्रोनचा वापर केला जातोय. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जातोय.

Pimpari Chinchwad Police Drone Updates:  नदीकाठी अथवा झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांवर टाच आणण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसाकडून ड्रोनचा वापर केला जातोय. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जातोय. या ड्रोन स्ट्राईकमुळे आता अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील कोयाळी गावात याच ड्रोनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. झाडाझुडुपांमध्ये भीमा नदीकाठी असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला आणि अंदाजे दहा लाख रूपये किंमतीचे 20 हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केलं.

पोलिसांनी एकाच ठिकाणी उभं राहून गावची टेहाळणी केली

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी गावात गावठी हातभट्टी जोमात चालते. अशा तक्रारी वाढत होत्या. यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. पण पोलिसांना ही गावठी हातभट्टी दिसून येत नव्हती. तोपर्यंत पोलीस गावात येऊन गेलेत, याची खबर हातभट्टी मालकांला लागायची. मग एखादं दिवस हातभट्टी विक्री बंद व्हायची. पण दुसरा दिवस उजडताच, गावात झिंगाटलेले महाभाग दिसून यायचे. मग पोलिसांनी ही गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यासाठी नामी शक्कल लढवली. त्यानुसार ड्रोन स्ट्राईक करायचं ठरलं. ड्रोन हवेत गेला, पोलिसांनी एकाच ठिकाणी उभं राहून गावची टेहाळणी केली. गावात काय हातभट्टी दिसेना, मग ड्रोनचा मोर्चा गावालगतच्या झाडाझुडपाकडे वळविण्यात आला. तिथं दोन-तीन झाडांच्या मधोमध एक हातभट्टी आढळली, ड्रोन जवळ घेऊन याची खात्री करण्यात आली. मालकाला याची खबर लागण्याआधीच पोलीस तिथं पोहोचले. मग जेसीबीला पाचारण करत, ही हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. अंदाजे दहा लाखांची तब्बल वीस हजार लिटर कच्चं रसायन याद्वारे नष्ट करण्यात आलं.

पिंपरी चिंचवड शहरप्रमाणेच राज्यातील प्रत्येक भागात असेच अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्या ठिकाणचे हे धंदे कायमस्वरूपी बंद करायची त्यांची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी या ड्रोन स्ट्राईकचं अनुकरण करायला हवं. भविष्यात हा ड्रोन स्ट्राईक इतर कारवायांमध्ये ही वापरात आणण्याची गरज आहे. ज्या द्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आळवणे शक्य होईल. यासाठी गृहविभागाने सुद्धा अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना द्यायला हव्यात. यामुळं राज्यातील गुन्हेगारी संपुष्टात येईल, याची खात्री देता येणार नाही. मात्र ती आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल, यात शंका नाही.

शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ड्रोन स्ट्राईकने ही पहिली मोठी कारवाई केली. यामुळं शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. अडगळीच्या भागात आपले धंदे थाटून, हे महाभाग नामानिराळे राहायचे. पोलिसांना कारवाई करताना अनेक अडचणी यायच्या. अडगळीच्या भागात पोहचण कठीण व्हायचं. यावर पोलिसांनी ही नामीशक्कल शोधली आहे. ड्रोन स्ट्राईकमुळं आता जलदगतीने आणि नेमक्या स्पॉटवर छापा टाकणं आता पोलिसांना शक्य होणार आहे. आळंदी परिसरातील ही कारवाईची पहिली झलक आहे. आता या अवैध धंदेवाल्यांना असे उपद्व्याप बंद करण्याखेरीज कोणताही पर्याय उरलेला नाही.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Babanrao Taywade on Manoj Jarange Patil: तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget