एक्स्प्लोर

माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या हत्येप्रकरणी चार जण ताब्यात

पिंपरी-चिंचवड : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांनी रविवारी सकाळी सचिन शेळके यांना अडवून बंदुकीचा धाकाने गाडीतून खाली उतरवलं. त्यानंतर शेळकेंवर कोयत्याने वार करुन गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. पूर्ववैमनस्यातून सचिन शेळकेंचा खून केल्याच्या आरोपाखाली श्याम रामचंद्र दाभाडे याच्यासह दहा जणांवर भारतीय दंड विधान कलम 302, 34 भारतीय आर्म्स अॅक्ट 352, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी दाभाडे, खंडू पचपिंड, संदीप पचपिंड आणि आकाश लोखंडे या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. भाजप नेते सचिन शेळकेंवर वार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोर कोण आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. खांडगे पेट्रोल पंपासमोर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी शेळके हे पेट्रोल पंपासमोरून त्यांच्या कारमधून येत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून बंदुकीचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सचिन शेळके यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, पक्ष प्रतोद आणि नगराध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तळेगाव बंद ठेवण्यात आलं. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेऊन घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी संपूर्ण मावळ बंदचे आवाहन केलं होतं. सचिन शेळके यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget