एक्स्प्लोर
रावण दहनावर बंदी आणा, याचिकाकर्त्यालाच 25 हजारांचा दंड

नागपूर : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिका कर्त्याला चांगलाच दणका दिला. रावणदहनावर बंदी आणावी अशी जनहीत याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला कोर्टाने झापलं. केवळ झापलंच नाही तर कोर्टाने याचिकाकर्त्यावर तब्बल 25 हजारांचा दंड ठोठावला. हा दंड मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेशही कोर्टाने दिले. काय आहे प्रकरण? जनार्दन मून नावाच्या याचिकाकर्त्याने नागपूर खंडपीठात रावणदहनावर बंदी आणावी अशी जनहीत याचिका दाखल केली होती. मात्र ही जनहीत याचिका अर्थात public interest litigation नव्हे तर publicity interest litigation म्हणजेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे, असं म्हणत कोर्टाने फटकारलं. इतकंच नाही तर प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे अशाप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं. तसंच कोर्टाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करण्याचा आदेशही दिला.
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















