एक्स्प्लोर

फोन टॅपिंग प्रकरण, राज्य सरकारकडून चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप तत्कालीन फडणवीस सरकारवर आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेश सिंह यांचा या समितीमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप तत्कालीन फडणवीस सरकारवर करण्यात आला आहे. या प्रकरणाची ही दोन सदस्यीय समिती तपास करणार आहे.

सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी फोन टॅपिंगचा आरोप केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.

फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- देवेंद्र फडणवीस

राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होते. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करुन त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

फोन टॅपिंग ही विकृती - जितेंद्र आव्हाड

पेगासेस आणि फोन टॅपिंगबद्दल भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. फोन टॅपिंग ही विकृती आहे. ही विकृती का केली याची चौकशी पाहिजे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याची गरज काय आहे. तुमचे आणि माझे राजकीय मतभेद आहे. ही विकृती असून याची चौकशी होत आहे. ही विकृती कोणी केली हे संपूर्ण देशाला आणि जगाला कळाले पाहिजे. पेगासेस विकत घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला होता का? हा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या

Phone Tapping | उद्धव ठाकरे, शरद पवारांचं फोन टॅपिंग होत होतं? माझा विशेष | ABP Majha

फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू, फोन टॅप केल्याचा भाजपवर आरोप

 

Phone Tapping | उद्धव ठाकरे, शरद पवारांचं फोन टॅपिंग होत होतं? माझा विशेष | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
Nashik News: मालेगावातील बंधाऱ्यावर रात्री हायव्होल्टेज ड्रामा, तरुणाचा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनासह पोलिसांची धावपळ, मीडियाच्या टीमने संवाद साधला अन्...
मालेगावातील बंधाऱ्यावर रात्री हायव्होल्टेज ड्रामा, तरुणाचा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनासह पोलिसांची धावपळ, मीडियाच्या टीमने संवाद साधला अन्...
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget