मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यातील ही सोळावी इंधन दरवाढ आहे. आज डिझेलच्या दरात 24 ते 28 पैशांची तर पेट्रोलच्या दरात 28 ते 29 पैशांची वाढ झाली आहे. पुण्यात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दराने शंभरीपार केली आहे. 


मुंबईत पेट्रोलची किंमत 100.47 रुपये आणि डिझेलची किंमत 92.45 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोल प्रति लिटर 102 रुपये 85 पैसे तर डिझेल प्रति लिटर 93 रुपये 32 पैसे एवढं आहे. तर पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 100.15 रुपये असून डिझेलसाठी प्रति लिटर 90.71 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 94.23 रुपये तर डिझेलचा दर 85.15 रुपये प्रति लिटर आहे. 


देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आज एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर असे आहेत.


शहर             डिझेल      पेट्रोल
दिल्ली            85.15      94.23
मुंबई             92.45     100.47
कोलकाता      88.00       94.25
चेन्नई             89.90       95.76


17 दिवसात 3.90 रुपयांनी पेट्रोल महागलं
मागील दोन महिन्यांपासून देशाचील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे मागील महिन्यात  कच्चं तेल महाग होऊनही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र कच्चं तेल स्वस्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले होते. याआधी पेट्रोल प्रति लिटर 77 पैसे स्वस्त झालं होतं. परंतु त्यानंतर मे महिन्यात पेट्रोलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने 17 दिवसातच पेट्रोल 3.90 रुपये प्रति लिटर महागलं आहे.


17 दिवसात 4.37 रुपये डिझेल महागलं
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 26 फेब्रुवारी रोजी आचारसंहिता लागू केली होती. यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी 27 फेब्रुवारी 2021 रोजी डिझेच्या दरात 17 पैसे प्रति लिटर शेवटची दरवाढ केली होती. यानंतर दोन महिन्याात कोणतीही दरवाढ झाली नाही. मार्च-एप्रिलदरम्यान डिझेलचे दर टप्प्याटप्प्याने कमी देखील झाली. त्यामुळे तेव्हा डिझेल 74 पैसे प्रति लिटर स्वस्त झालं होतं. परंतु निवडणुका होताच आता 17 दिवसातच डिझेल 4.37 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.


दरदिवशी सहा वाजता इंधनाचे दर बदलतात
दरदिवशी सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतात. सकाळी सह वाजताच नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर कर लागल्यानंतर त्याचा दर जवळपास दुप्पट होतो. याच्याच आधारावर पेट्रोल आणि डिझेलचा दर दररोज निश्चित करण्याचं काम तेल कंपन्या करतात. डीलर हे पेट्रोल पंप चालवणारे लोक आहेत. कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ते किरकोळ दराने ग्राहकांना इंधनाची विक्री करतात.


तुमच्या शहरातील इंधनदर जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार तुम्हा RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर पाठवा. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे, जो तुम्हाला आयओसीएलच्या वेबसाईटवर मिळेल.