मुंबई : राज्यात आज गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात आज 18 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 22 हजार 532 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.55 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 402 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 16 मार्च रोजी राज्यात राज्यात 17864 रुग्णांची नोंद झाली होती. 


राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 16.44 टक्के आहे. म्हणजेच एकूण तपासणींपैकी 16 टक्क्यांहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के आहे. राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 801 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत. 


CM Uddhav Thackeray Speech: संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


ब्रेक दि चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, काय सुरु, काय बंद?



  • सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील. 

  • सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.

  • अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

  • दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

  • कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

  • कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते  


CM Uddhav Thackeray Speech : राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा