मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. आता त्यात गेल्या काही वर्षात इंधनाची ही भर पडलीय. आज पेट्रोल, डिझेल हे सामान्य असो की श्रीमंत व्यक्ती असो, प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. त्यातच ज्या पद्धतीने या तिन्ही मूलभूत गरजाच्या किमती वाढल्यात त्याच पद्धतीने इंधनाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेत. आज मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा वगळता सर्वत्र पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलचीही नव्वदी पार करत शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. परभणीत तर आज पेट्रोल 101 रुपये 53 पैसे तर डिझेल हे 91 रुपये 62 पैसे दराने विक्री केले जात आहे, हा राज्यातील सर्वाधिक दर आहे..


केंद्र सरकारने इंधन दर नियंत्रण मुक्त केल्याने तेल कंपन्याच्या हातात इंधन दरवाढ आणि कपात दोन्ही गोष्टी आल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव कमी असो अथवा जास्त, आपल्याकडे इंधन दर हे सातत्याने वाढत आलेले आहे..मागच्या पाच वर्षाची आकडेवारी आम्ही काढली, ज्यात 1 मे 2016 रोजी परभणीत पेट्रोल हे 62.57 रुपये एवढे होते, 1 मे 2018 रोजी 84.90 रुपये होते तर 1 मे 2020 कमी होऊन 78.35 रुपये झाले. आता 1 मे 2021 मध्ये हेच दर थेट 100 रुपये 75 पैसे एवढे झाले आहेत. म्हणजेच मागच्या पाच वर्षात पेट्रोल तब्बल 39 रुपये 02 पैसे तर डिझेल ही 40 रुपयांनी महागले आहे..


तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
पेट्रोलच्या किमतीपेक्षा यावर आकारण्यात येणारे कर कितीतरी पटीने अधिक आहेत. एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत 38 रुपये 10 पैसे आहे. त्यात एक्साईज ड्युटी 32 रुपये 98 पैसे, राज्य शासनाचा टॅक्स 26 रुपये २26 पैसे आणि डीलरचे कमिशन 3 रुपये 41 पैसे आहे. त्यामुळे पेट्रोलची मूळ किंमत आणि कर पहाता किती मोठ्या प्रमाणात हा नागरिकांना कर द्यावा लागतो हे स्पष्ट होते. 


दरम्यान मागच्या दोन वर्षापासून सर्वत्र कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे त्यामुळे लॉकडाऊन आहे. अनेक उद्योगधंदे या लॉकडाऊनमुळे बंद पडले आहेत, अनेकांचे रोजगार गेले. अशा परिस्थितीत महागाई वाढली आणि त्यात वाढत चाललेले इंधन दर. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. म्हणून ही इंधन दरवाढ कुठेतरी कमी व्हावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.


मराठवाड्यातील जिल्ह्यातील आजच्या इंधन दरावर एक नजर


परभणी
पेट्रोल- 101.53 रुपये
डिझेल- 91.62 रुपये


हिंगोली
पेट्रोल- 100.15  रुपये
डिझेल- 90.33  रुपये


नांदेड
पेट्रोल- 101.31  रुपये
डिझेल- 91.43  रुपये


जालना
पेट्रोल- 100.32  रुपये
डिझेल- 90.47  रुपये


बीड
पेट्रोल -100.19  रुपये
डिझेल -90.34  रुपये


उस्मानाबाद
पेट्रोल- 99.60  रुपये
डिझेल- 89.78  रुपये


सोलापूर
पेट्रोल- 99.01 रुपये
डिझेल- 89.22 रुपये
102.42 - extra प्रीमियम



महत्वाच्या बातम्या :