Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 मे 2021 गुरुवार | ABP Majha
1. राज्यातील कोरोना उतरणीला, बुधवारी राज्यात 34,031 नवीन रुग्णांचे निदान तर 51,457 रुग्ण बरे होऊन घरी
2. घरोघरी जाऊन लसीकरणाची तयारी असल्यास परवानगी देऊ, तातडीनं भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला आदेश
3. घरीच अँटिजेन टेस्ट करण्यासाठी पुण्याच्या कंपनीनं तयार केलेल्या किटला ICMR ची मंजुरी
4. कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा, तज्ज्ञ समितीच्या नव्या गाईडलाईन्स
5. वादळाची सूचना मिळूनही कर्मचाऱ्यांना माघारी का बोलावलं नाही, 34 जणांच्या मृत्यूनंतर कंपन्यांच्या भूमिकेवर सवाल
6. चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानासाठी गुजरातला 1 हजार कोटी, मोदी सरकार महाराष्ट्राला काय देणार याकडे लक्ष
7. तीव्र विरोधानंतर अखेर रासायनिक खतांची दरवाढ मागे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पवारांसह अनेक नेत्यांनी दर्शवला होता विरोध
8. तोक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका; शेकडो घरांची पडझड , तर लाखों रुपयांचं नुकसान
9.पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या, नितीन राऊतांची मागणी, विधी विभागाच्या अहवालानंतर अंतिम निर्णय होणार
10. राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही, दहावी परीक्षेच्या सुनावणीदरम्यान महाधिवक्ता गैरहजर राहिल्याने उच्च न्यायालयाचे ताशेरे