एक्स्प्लोर
Advertisement
अस्वच्छ वातानुकूलित डब्यांमुळे प्रवाशांनी रेल्वे थांबवली
नांदेड : नांदेड-पनवेल एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी नांदेडमध्येच गाडी रोखून धरली. एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात अस्वच्छता असल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी रेल्वे थांबवली.
नांदेडहून पुण्याच्या दिशेने ही गाडी धावते. या गाडीच्या वातानुकूलित डब्यात अस्वच्छता प्रवाशांना आढळून आली, सोबतच झुरळंही फिरताना दिसली. संतापलेल्या प्रवाशांनी लगेच गाडी थांबवत गाडीची स्वच्छता करण्याची मागणी केली.
रेल्वे प्रशासनानंही तातडीनं या गाडीतील वातानुकूलित डब्यांचं साफसफाईचं काम सुरु केलं.
रेल्वे प्रवासात कोच स्वच्छ नसतील तर काय कराल?
रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी क्लीन माय कोच सेवा सुरु केली आहे. रेल्वेनं त्यासाठी http://cleanmycoach.com/ ही वेबसाईटही लॉन्च केली आहे. वेबसाईटवर आपल्या पीएनआर नंबरसह कोच क्लीनिंगची विनंती देता येते.
कोच स्वच्छ नसतील तर 58888 किंवा 9200003232 या क्रमांकावर CLEAN स्पेस PNR NUMBER स्पेस SERVICE TYPE CODE पाठवून विनंती देता येते.
यात सर्व्हिस कोड टाईप महत्त्वाचा आहे. C हा कोड क्लिनिंगसाठी, W हा कोड कोचमध्ये पाण्यासाठी, P पेस्ट कंट्रोलसाठी, B बेडरोलसाठी, E एसी किंवा लाईटसाठी आणि R किरकोळ दुरुस्तीसाठी वापरणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement