एक्स्प्लोर

'माहिती घेऊन सांगतो', पार्थ पवारही अजित पवारांच्या राजीनाम्यापासून अनभिज्ञ

पवार यांनी आपला राजीनामा बागडे यांना मेलद्वारे पाठविला असून तो अध्यक्षांनी स्वीकारला आहे. मात्र या राजीनाम्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार देखील यापासून अनभिज्ञ आहेत.

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांनी तो सुपूर्त केला होता. पवार यांनी आपला राजीनामा बागडे यांना मेलद्वारे पाठविला असून तो अध्यक्षांनी स्वीकारला आहे. मात्र या राजीनाम्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार देखील यापासून अनभिज्ञ आहेत. त्यांनाही पवारांच्या राजीनाम्याबद्दलचं खरं कारण माहिती नाही. एबीपी माझाने पार्थ यांच्याशी संपर्क केला असता, आपल्याला याबद्दलची काही माहिती नसल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रमुख नेत्यांनाही पवारांच्या राजीनाम्याबद्दल काहीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार शुक्रवारी शरद पवारांसोबत ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी मुंबईत येणार होते. मात्र पुणे आणि बारामतीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानाचं पाहणी करण्यासाठी अजित पवारांनी मतदारसंघात राहिले असं सांगितलं जात आहे. अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह 70 जणांची नावं 25 हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार ही बातमी चर्चेत होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार यांनी हरिभाऊ बागडे यांच्याशी फोनवर बोलून आपला राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने तो स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले. या विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी असताना पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे. याविषयी बागडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मला अजित पवारांचा फोन आला होता. मला कुठं आहात असं विचारलं. त्यांनी आपल्या हस्ताक्षरानं लिहिलेला राजीनामा मेल केला. 5.30 वाजता मेल आला. त्यानंतर मला फोन केला. तातडीने राजीनामा मंजूर करा असं सांगितलं. मी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. असा राजीनामा आला आणि फोन केला तर राजीनामा मंजूर केला जातो, असंही ते म्हणाले. याविषयी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देखील अजित पवारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे. दरम्यान, काही तासापूर्वीच त्यांनी शरद पवार यांना आज दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.  मुंबईत आदरणीय शरद पवार साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर,दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Girish Mahajan: 'वयाचा विचार करता आम्ही आता किती दिवस काम करणार...'; गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत? 'त्या' विधानाची जोरदार चर्चा
'वयाचा विचार करता आम्ही आता किती दिवस काम करणार...'; गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत? 'त्या' विधानाची जोरदार चर्चा
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Embed widget