जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन सुरु झालेला वाद शिगेला, परभणीत पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत संघर्ष

पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी Updated at: 09 Aug 2021 12:40 PM (IST)

माकडीणही स्वतः बुडायला आल्यावर लेकराला पायाखाली घालते. लक्षात ठेवा नाही तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही घालू, असं खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्हाधिकारी नियुक्तीचा वाद शिगेला पोहोचलाय.

Feature_Photo_5_(9)

NEXT PREV

परभणी  :  परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून सुरु झालेला वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी अखेर मौन सोडले आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीची शिफारस आपण केली असल्याचे त्यांनी जाहीर भाषणात सांगितले. शिवाय याच नियुक्तीवरून त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष समोर आला आहे.


आंचल गोयल यांच्या पुनर्नियुक्तीचे परभणीकरांकडून स्वागत; जिल्हाभरात केलेल्या संघर्षाला यश


जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना परभणीचे खासदार संजय जाधव यांची एक व्हिडीओ क्लिप समोर आली असून ज्यात ते स्वतः सांगताहेत कि परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीची शिफारस त्यांनी स्वतः केली. मात्र या एवढ्याशा गोष्टीवरून राष्ट्रवादीने आपल्या विरुद्ध रान पेटवले. त्यामुळे आमच्याही भावना अनावर होत आहेत. कुठपर्यंत सहन करायचे याला ही मर्यादा आहेत. शेवटी माकडीणही स्वतःला बुडायचे असल्यावर लेकराला पायाखाली घालते. तेव्हा लक्षात ठेवा आम्ही राष्ट्रवादीला तर केव्हाही घालू. आम्ही आता सहनशीलतेच्या पुढे गेलोत. यांना सगळंच जमायलंय. स्वतःच ठेवायलेत झाकून अन आमचं पाहायलेत वाकून पण आम्ही ही मुख्यमंत्र्यांचा आदेश हा मानला पण प्रत्येक गोष्टीत आम्हाला खाजवायचे काम राष्ट्रवादीकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.


'जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही', कलेक्टर बदली प्रकरणावर पालकमंत्री नवाब मलिकांचं स्पष्टीकरण


काय म्हणाले संजय जाधव
खासदार संजय जाधव घनसावंगी येथील शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना म्हणाले की,  आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले याला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. एवढं असताना सुद्धा पुन्हा भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा जसं काय याच्या बापाची जहागिरीच आहे.  मग कुठं कुठं आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा.  शेवटी काही मर्यादा असतात कुठपर्यंत शांत बसायचय कुठपर्यंत सहन करायचंय. माकडीणही स्वतः बुडायला आल्यावर लेकराला पायाखाली घालते. लक्षात ठेवा नाही तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही घालू. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलो.  जिल्ह्यात एक कलेक्टर बदलायचा होता मी मुख्यमंत्र्यांकडे एक शिफारस केली होती. तर राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवले जसं काय मी एखादा अपराध केला होता. तुम्हाला सगळं जमायलंय म्हणजे आपला ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून.  तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा आदेश मानला जे काही आदेश येईन ते मान्य केलाय.  पण प्रत्येक गोष्टीत आम्हाला खाजवाखाजवी सुरु आहे हे तुम्हाला सांगतो. 2 वर्ष झालं आम्हाला खासदार निधीच नाही.  रोज कार्यकर्त्यांचा आम्हाला फोन येतो आमचं काही आहे का नाहीय. डीपीडीसीतून एक कोटी मिळाले त्यातले 70 लाख मी घनसावंगीत दिले. 30 लाख मी परतुरला दिले.  मी गुत्तेदाराला कधी काम देत नाही, संघटनेचं काम करतो त्या थेट कार्यकर्त्याला देतो त्यांचा चहाही मी पित नाही.  विधानसभेत आपण हरलोत पण आता आपल्याला पुन्हा जिंकायची आहे.  त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायच्या आहेत तोच आपला विधानसभा जिंकण्याचा पाया असणार आहे. 



माकडीणही स्वतः बुडायला आल्यावर लेकराला पायाखाली घालते. लक्षात ठेवा नाही तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही घालू. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलो.  जिल्ह्यात एक कलेक्टर बदलायचा होता मी मुख्यमंत्र्यांकडे एक शिफारस केली होती. तर राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवले जसं काय मी एखादा अपराध केला होता. तुम्हाला सगळं जमायलंय म्हणजे आपला ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून.  - खासदार संजय जाधव


परभणीत राजकीय दबावातून नूतन जिल्हाधिकारी पदभार न घेताच परतल्या!


 

Published at: 09 Aug 2021 12:00 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.