एक्स्प्लोर

परभणी शहरातील अपघातांची थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल  

Parbhani News :  परभणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली मागणी जवळपास मान्य झाल्याने परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Parbhani News : परभणी शहराचा प्रचंड विस्तार झाला मात्र  शहरातील रस्ते मात्र अद्याप ही तसेच आहेत. मुख्य रस्ते असो वा छोटे मोठे रस्ते असो हे रस्ते अरुंद राहिलेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण या रस्त्यांवर झालेले आणि यामुळेच दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण शहरांमध्ये वाढत आहे. याच अनुषंगाने परभणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली मागणी जवळपास मान्य झाल्याने परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परभणीतील कुठल्याही रस्त्यावर जा एक तर खड्डे नाही तर अतिक्रमण हे त्यामुळे सामान्य नागरिकांना चालणेही मुश्किल झालेले आहे. मागच्या आठवडा भरात शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात 2 शिक्षक, एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कार्यकारी परिषद सदस्य प्रवीण देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे  शहरातील खानापूर फाटा ते असोला पाटी व विसावा कॉर्नर ते पुढे चार किलोमीटर रस्ता रुंदीकरण आणि पथदिव्यांसह दुभाजक असावेत अशी मागणी केली होती.


परभणी शहरातील अपघातांची थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल  

त्याची गडकरी यांनी तात्काळ दखल घेत शहरातील खानापूर फाटा ते असोला पाटी 6 किलोमीटर व विसावा कॉर्नर ते ESSAR PUMP ४ किलोमीटर रस्ता रुंदीकरण आणी पथदिव्यांसह दुभाजक चालू आर्थिक वर्षाच्या Annul plan मध्ये मान्यता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या अनुषंगाने गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता, प्रादेशिक अधिकारी,कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले असून लवकरच याबाबत निर्णय होऊन काम सुरू केले जाणार आहे..

सामान्य माणसाची दखल नितीन गडकरीच घेऊ शकतात- देशमुख

परभणी सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याची दखल हे केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच घेऊ शकतात आणि अशा प्रकारे कामांना न्याय देऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून समस्त परभणीकरांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया प्रवीण देशमुख यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget