परभणी : राज्यभरातील तब्बल 20 हजार महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मागच्या पाच वर्षात राज्य शासनाने 19 मागण्यांपैकी एकाही मागणीचा विचार न केल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे.


अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहाय्यक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवणे या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून राज्यातील सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

महाराष्ट्रातील संपात सहभागी अधिकारी आणि कर्मचारी

1. नायब तहसीलदार : 346
2. लिपिक व अव्वल कारकून : 16350
3. शिपाई : 4500

एकूण : 21,196