1. मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत, रात्रभर पावसाने उसंत घेतल्याने रस्ते वाहतुकीचा मार्गही मोकळा


2. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघरला अतिवृष्टीचा इशारा, सावधानता म्हणून मुंबई, ठाणे, कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर

3. गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला

4. कोयना धरणाचे दरवाजे 6 वरुन 10 फुटांवर, 90 हजार क्युसेक वेगाने विसर्ग, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ, सिंधुदुर्गातही मुसळधार पाऊस

5. विधानसभेला रिपाइं भाजपच्या चिन्हावर लढणार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण, रामदास आठवलेंकडून आज प्रदेश मेळाव्यात घोषणेची शक्यता



6. राष्ट्रवादीमुळे हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता, 10 सप्टेंबरला निर्णय जाहीर करणार, पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

7. वंचित बहुजन आघाडीत फूट पडण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांकडून एमआयएमला 8 जागांची ऑफर, तर एमआयएमची 75 जागांची मागणी

8. नव्या दहशतवादविरोधी कायद्याचा दणका, मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद आणि लख्वी दहशतवादी म्हणून घोषित, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

9. आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करुन मंदीतून बाहेर काढलं होतं, खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

10. मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीचा निर्णय झाला असला तरी काम सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही, मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती