Parli Accident:  परळीतूप अपघाताची बातमी समोर येत असून राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर झाला असून ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामिण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला पकडण्यात आले आहे. (Accident News)


नक्की झाले काय?


बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात मिरवट फाट्यावर टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. सौंदाना येथील सरपंच क्षीरसागर हे दुचाकीवरून जात असताना राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांना उडवलं, ज्यामुळे हा गंभीर अपघात घडला. बीडच्या परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मोटरसायकल स्वाराला उडविले आहे. (Parli Accident) या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात झाला जात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला.


गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले


 बेळगावमध्ये (Belgaum) अशीच एक दुर्दैवी घटना घडली असून दोन भावांना असलेलं गांजाचं व्यसन एकाच्या जीवावर बेतल्याचं पाहालया मिळालं. गांजा ओढण्यावरून दोघा भावंडांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसन होऊन दोघेही भाऊ तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत (Accident) एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दोन्ही पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील निलजी गावामध्ये  घडली. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवरही शोककळा पसरली आहे. मात्र, दोन्ही भावांचे गांजाचे व्यसनच या दुर्घटनेत कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.


अज्ञात इसमाला दगडाने ठेचून संपवलं


अहिल्यानगर जिल्ह्यात नगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळ दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात एका 36 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात इसमाने दगडाने ठेचून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी ही घटना समोर आली असून, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत व्यक्तीचे नाव अश्विन मारुती कांबळे असे आहे. (Maharashtra)


हेही वाचा:


Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर