एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मतदान पनवेलमध्ये, उमेदवार गावाकडे!
नवी मुंबई: पनवेल महापालिका निवडणूक ऐन रंगात आली आहे. येत्या 24 मे रोजी मतदान होत आहे. मात्र उन्हाचा पारा वाढत असल्याने मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे. त्यातच मतदार गावी गेल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी थेट गावं गाठली आहेत.
सध्या उन्हाळी सुट्यांचा काळ सुरु असल्याने अनेक मतदार हे आपल्या गावी निघून गेले आहेत. याचा परिणाम हा मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी या मतदारांना परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. काहींनी तर गावाकडून मतदारांना परत आणण्यासाठी 'फिल्डिंग' लावली आहे.
काही उमेदवार सुट्टीवर गेलेल्या मतदारांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत. जी घरं बंद आहेत त्याची माहिती घेत आहेत. कुणी व्हॉट्स अपवरुन,कुणी फेसबुकवरून तर कुणी थेट फोन करुन या मतदारांना मतदानासाठी येण्याची विनंती कारत आहेत.
अनेक उमेदवारांनी थेट आपल्या गावाकडील उमेदवारांशी संपर्क साधला. यासाठी या उमेदवारांनी एक टीम बनवून आपल्या गावी पाठवली आहे. ही टीम गावात जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करून गावी गेलेल्या मतदारांना मतदानासाठी येण्याची गळ घालत आहेत. यासाठी येण्या -जाण्याची व्यवस्थाही हे उमेदवार करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement