एक्स्प्लोर

कॉ. पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण, मारेकरी अद्याप मोकाटच

नुकतेच उच्च न्यायालयाने दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा छडा न लागल्यानं तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली होती. जोपर्यंत मारेकऱ्यांना शोधात नाही, तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार असल्याचं उमा पानसरे यांनी म्हटलं.

पुणे/कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज तीन वर्षे पूर्ण झाली. कॉम्रेड पानसरेंचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावे, यासाठी पुणे, कोल्हापूरसह राज्यभरात शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यात आली. मारेकऱ्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना यश आलं नाही. या हत्या प्रकरणातील दोन संशयितांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणा नेमकं काय करतात, असा सवाल केला जातो आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 54 महिने पूर्ण झाली. तरीही या दोन विचारवंतांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. त्या विरोधात आज पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर निषेध करण्यात आला. याच ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, 93 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई रानडे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापुरात उमा पानसरे यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉक करुन पानसरेंच्या हत्येचा निषेध केला. त्याचबरोबर तपास यंत्रणा नेमक्या काय करत आहेत, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजप सरकारवरही कडाडून टीका केली. नुकतेच उच्च न्यायालयाने दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा छडा न लागल्यानं तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली होती. जोपर्यंत मारेकऱ्यांना शोधात नाही, तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार असल्याचं उमा पानसरे यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
Video: नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, आंदोलकांची बॅनरबाजी; केंद्रीयमंत्री म्हणाले, पोलिसांनी बाहेर काढावं
Video: नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, आंदोलकांची बॅनरबाजी; केंद्रीयमंत्री म्हणाले, पोलिसांनी बाहेर काढावं

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Embed widget