बीड : राजकारणात मला नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवण्याची शिकवण मुंडे साहेबांनी दिली आहे. मी धनंजय मुंडे यांना पुरस्कार मिळाला तेव्हा देखील त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि माझ्यासमोर कोणताही राजकीय नेता आला असता तरी मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असत्या, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
आरोप करण्याऱ्यांना उत्तरं देणं मला महत्वाचं वाटत नाही
परळीत राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची समोरासमोर भेट झाली होती. यावेळी दोघांनीही एकमेकांना आनंदाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अमेरिका दौऱ्याबाबत मुंडे म्हणाल्या की, आरोप करण्याऱ्यांना उत्तरं देणं मला महत्वाचं वाटत नाही, मी जनतेला त्याचं उत्तर देईल. अमेरिकेला जाणं म्हणजे माझी हौस नाही. मी त्या ठिकाणी काही काळ वास्तव्य केलेलं आहे. त्यामुळे त्याचं मला आकर्षण नाही. मी जरी परदेशात गेले होते तर आदिवासी आणि दुष्काळी भागातील महिलांना घेऊन गेले. त्या महिलांच्या बचत गटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी म्हणून गेले होते, असे त्या म्हणाल्या.
मुंडे म्हणाल्या की, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी जरी दुष्काळ दौरे केले असले तरी त्यांनी त्यात काय साध्य केलं हे मला माहित नाही. मी अमेरिकेला जाण्याअगोदर दुष्काळाची पाहणी केली. मी कलेक्टरसह अन्य अधिकाऱ्यांसोबत दुष्काळ बैठक घेतली. स्वतः मी याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दिला आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने परदेशात गेले.
2019 ची माझी दिवाळी व्यस्त असणार आहे. पुढची दिवाळी सत्ता स्थापनेची असणार आहे. विरोधक जातीवादाचे शस्त्र वापरू शकते मात्र जनता त्यांना जुमानणार नाही, असेही मुंडे म्हणाल्या. भाजप सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून विरोधकांचे फटाके फुसके झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची समोरासमोर भेट
परळीत राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना आनंदाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बीडच्या व्यापार भागात आज लक्ष्मी पूजनाची लगबग होती. सगळे मार्केट फुलून गेले होते. यावेळी व्यापाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे परळीचा व्यापार भागात पोहोचल्या. त्याचवेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील शुभेच्छा देण्यासाठी व्यापाऱ्याकडे गेले होते. दोघेही आपल्या समर्थकांसह परळीच्या मोंढा भागात असतांना अचानक या बहीण-भावांची सुरेश मुंडे यांच्या आडत दुकानात अचानक भेट झाली. यावेळी दोघेही समोरासमोर आले. त्यामुळे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले, मात्र अचानक समोरासमोर आलेल्या या भावंडांनी हसतमुख होत हस्तांदोलन करत एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत शुभचिंतन केले. मग या दोन्हीही नेत्यांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा दिल्या. दोघांनी आपसूक एकाचवेळी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. नंतर "हॅपी दिवाळी" असे शब्दही दोघांच्या तोंडून एकदाच निघाले. नंतर दोघांनी एकमेकांच्या हातात हात दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांच्याशी संवाद साधून त्यांनाही शुभेच्छा दिल्या. काही क्षणासाठी ही आनंदी भेट परळीकरासाठी चर्चेचा विषय ठरली.
कोणताही राजकीय नेता असता तरी मी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असत्या : पंकजा मुंडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Nov 2018 05:04 PM (IST)
आरोप करण्याऱ्यांना उत्तरं देणं मला महत्वाचं वाटत नाही, मी जनतेला त्याचं उत्तर देईल. अमेरिकेला जाणं म्हणजे माझी हौस नाही. मी त्या ठिकाणी काही काळ वास्तव्य केलेलं आहे. त्यामुळे त्याचं मला आकर्षण नाही.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -